spot_img
ब्रेकिंगठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

ठरलं! अजित पवार कुठून निवडणूक लढवणार? प्रफुल्ल पटेल यांनी केली घोषणा..  

spot_img

Maharashtra Politics News: महायुतीने महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली यादी दसऱ्याला जाहीर होणार आहे. दरम्यान लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात नुकतंच एक महत्वाचं विधान केलं होतं. आपण बारामतीत जो उमेदवार देऊ त्याला निवडून द्या, असे ते म्हणाले होते. त्यामुळे बारामतीमधून कोण निवडणूक लढवणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होता.  

दरम्यान, महायुतीच्या 235 उमेदवारांची पहिली यादी दसऱ्याला म्हणजेच12 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. अशी घोषणा राष्ट्रवादीचे (अजित गट) कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. तसेच गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे बारामतीमधून लढणार नाहीत, अशीही चर्चा होती. त्यावरही प्रफुल पटेल यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून बारामतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. मी पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृत सांगतो की अजित पवार हे बारामतीतून उमेदवार असतील. मी पहिली जागा जाहीर करतो, असं ते म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांच्या घोषणेनंतर अजित पवार अन्य कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षण; सरकारसमोर मोठं आव्हान; कोर्टात ‘या’ गोष्टी सिद्ध कराव्या लागणार

Maratha Reservation : तर मराठा सामाजासाठी एसईबीसीचा जो मध्यममार्ग सरकारने शोधला होता. त्याचावर वक्रदृष्टी...

विधानसभेतील गद्दारांना योग्य ती शिक्षा मिळणार; खा. लंके यांचे आगामी निवडणुकाबाबत मोठे वक्तव्य

पारनेर । नगर सहयाद्री स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार करत खासदार नीलेश...

शेवगाव, पाथर्डीतील मावा विक्रेत्यांवर छापे; ४ आरोपींना अटक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर मावा व...

२६ गोवंशीय जनावरांची सुटका; पोलिसांनी ‘असा’ लावला सापळा, ३ आरोपींसह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे आणलेल्या २६ गोवंशीय जनावरांची...