spot_img
महाराष्ट्रमहिला वकिलाला जीवे मारण्याची धमकी; कारण काय?

महिला वकिलाला जीवे मारण्याची धमकी; कारण काय?

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री: –
शहरातील काटवन खंडोबा परिसरात राहणाऱ्या एका महिला वकिलाला सतत धमक्या देणाऱ्या इसमाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात संशयित इसमाने महिलेच्या घरात अनधिकृतरित्या शिरण्याचा प्रयत्न केला तसेच तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

महिला वकील नाजमिन वजीर बागवान (वय-34) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. फिर्यादी त्यांच्या 11 वषय मुलासह राहतात. सोमवारी (10 फेब्रुवारी) दुपारी 01 ते 01:45 दरम्यान इसम किरण कोळपे हा अनधिकृतरित्या त्यांच्या घराच्या कंपाउंडवरून उडी मारून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले.

यावेळी फिर्यादीला मुलाने फोनद्वारे माहिती दिली. त्यावेळी त्या फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर, घरी जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता किरण हा आपल्या कार (एमएच 17 व्ही 1850) मधून दिवसभर घरावर लक्ष ठेवत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर फिर्यादीने किरणला फोन करून या कृत्याबद्दल विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करत, तुला आणि तुझ्या मुलाला संपवीन, पोलिसांनाही सोडणार नाही, अशी धमकी दिली.

रात्री 09:30 च्या सुमारास फिर्यादी आपल्या मुलास सुरक्षितस्थळी नेत असताना किरण याने पुन्हा फोन करून, तू कुठे लपली आहेस? बाहेर निघ, नाहीतर गोळ्या झाडीन आणि तुझे घर पेटवून देईन, अशी धमकी दिली. तसेच, त्यांच्या सोबत असलेल्या चुलत बहिणीला देखील संपवण्याची धमकी दिली. या सततच्या धमक्यांमुळे भयभीत झालेल्या फिर्यादीने कोतवाली पोलिसांना माहिली दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...