spot_img
ब्रेकिंगएकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; ठाण्याच्या तरुणाचा प्रताप..

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; ठाण्याच्या तरुणाचा प्रताप..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव हितेश प्रकाश धेंडे असून तो ठाणे येथील रहिवासी आहे. याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत.

तरूणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी श्रीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले तेव्हा पोलिस ठाण्याबाहेर पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय हितेशने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

याबाबत त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात थेट एकनाथ शिंदे यांचे नाव घेत त्यांच्या घरावर गोळीबारात करणार असल्याचे म्हणत त्यांना ठार करणार असल्याचे बोलताना दिसून येत आहे. या प्रकारानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

याबाबत बोलताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, तरुणाने एकनाथ शिंदे यांना धमकी का दिली, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. तो विकृत स्वभावाचा असल्याचे बोलले जात आहे.या अगोदर देखील त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे म्हटले जात आहे, आता आमच्या कार्यकर्त्यांकडून त्याचा शोध सुरु आहे. असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....