अहिल्यानगर । नगर सहयाद्री :-
अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले असून तिरुपती बालाजी येथून दर्शन करून परतत असताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये तिघे तरुण ठार झाले आहेत. तर एक गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. शेवगाव येथील काही महाविद्यालयीन तरुण तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते.
कारने परत गावी येत असताना त्यांच्या कारला मंगळवारी अपघात झाला. संबंधितांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील उरवकोंडा परिसरात कार पलटी होऊन सदर अपघात झाला आहे. या अपघातात सौरभ विष्णू अकोलकर (रा. हातगाव, ता. शेवगाव), तुषार सुनील विखे (रा. मिरी रोड, सोनविहार, ता. शेवगाव), श्रीकांत थोरात (विद्यानगर, शेवगाव ) हे तिघे मयत झाले आहेत.
सुमित अकोलकर हा युवक गंभीर जखमी झाला आहे. परराज्यात सदरचा अपघात घडल्याने अधिकची माहिती समजू शकली नाही. या घटनेची माहिती मिळताच संबंधितांचे नातेवाईक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले आहेत.