Maharashtra News: रविवारी सायंकाळी क्रिकेट खेळत असताना विजेच्या धक्क्याने एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हर्षल पिंगळे असं मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मैदानात हा मुलगा क्रिकेट खेळत होता. क्रिक्रेट खेळत असताना बॉल उडून एका घरावरील पत्र्यावर गेला. तेव्हा हर्षल हा बॉल काढण्यासाठी पत्र्यावर चढला.
बॉल घेऊन खाली उतरत असताना घरावरुन गेलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागला.
आरडाओरड होताच गावातील नागरिक धावत आले. त्यांनी लाकडी काठीने हर्षलला बाजूला तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
याबाबत हर्षलचे वडील संतोष चंदर पिंगळे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली.पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे. गावात घडलेल्या दुदैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.