अहमदनगर । नगर सहयाद्री
निघोज-वडगाव रस्त्यावरील हॉटेल जत्राच्या मालकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये हॉटेल मालक प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले आहे. यामुळे परिसरातील हॉटेल व्यवसायीकामध्ये घबराट निर्माण झाली असून एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी गणेश भुकंन यांच्या फिर्यादीयावरून आदिनाथ मच्छिद्र पठारे (रा. पठारवाडी, ता. पारनेर), धोंड्या उर्फ धोंडीभाऊ महादु जाधव (रा. निघोज कुंड ता. पारनेर ), सोन्या उर्फ प्रथमेश विजय सोनवणे (रा. निघोज ता. पारनेर) विशाल खंडु पठारे (रा. पठारवाडी, ता. पारनेर), शंकर केरु पठारे (रा. पठारवाडी, ता. पारनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधीक माहिती अशी: फिर्यादी यांच्या मालकीची निघोज-वडगाव रस्त्यावर जत्रा हॉटेल आहे. हॉटेल मंगळावरी रात्री पठारवाडी येथील फिर्यादी यांच्या ओळखीचे अदिनाथ मच्छिद्र पठारे, विशाल खंडु पठारे व शंकर केरु पठारे हे आले त्यांनी जेवणाची मागणी करत जेवण दयावेच लागेल नाहीतर मी राडा करील असे धमकावले.
वाद नको म्हणुन फिर्यादी यांनी त्यांना जेवण देण्यास सांगितले. त्यानंतर जेवण करत असताना आदिनाथ याने जेवण व्यवस्थीत नाही असे म्हणुन जेवण करत असताना मोठ मोठ्याने शिव्या देण्यास सुरवात केली. तेव्हा हॉटेलच्या बाहेर उभा असलेला फिर्यादी यांचा भाऊ प्रविण हा आत आला व शिव्या देवु नका, पाहिजे तर बिल देवु नका, असे म्हणाला असता तिघांनी भाऊ प्रविण यास धक्काबुक्की केली.
दरम्यान आदिनाथ पठारे हा म्हणाला माझ्या भाईला बोलावुन घेतो. तुम्हाला आता सोडणार नाही. असा दम दिला. त्यावेळी त्यांची समजुत काढुन फिर्यादी यांनी त्यांना हॉटेलच्या बाहेर काढुन दिले. त्यानंतर ११ वाजेच्या सुमारास पुन्हा ते हॉटेल मध्ये आले. त्यावेळी आदिनाथ पठारे याचे हातात कोयता, धोंड्या जाधव याचे हातात तलवार, विशाल पठारे याचे हातात पाईप, शंकर पठारे याचे हातात दांडा होता.
त्यातील आदिनाथ पठारे याने कोयत्याच्या उलट्या बाजुने मारहाण केली. तसेच धोंड्या जाधव यांने फिर्यादी यांचा भाऊ प्रविणच्या शरीरावर तलवारीने वार करत गंभीर जखमी केले. चुकीच्या लोकां बरोबर पंगा घेतलाय असे म्हणात प्रथमेश सोनवणे यांने जीवे मारण्याची धमकी दिली तर विशाल पठारे आणि शंकर पठारे यांनी हातातील पाईपाने मारहाण केली. तसेच हॉटेल मधील एल.ए.डी टिव्ही, लॅपटॉप, कॉऊटर, लॅपटॉपची वायरींग असे सर्व साहित्य तोडुन सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.