spot_img
देशदाऊदवर खरच विषप्रयोग झाला? पाकिस्तानात गुगल, युट्युब, ट्विटर सार बंद का केलं...

दाऊदवर खरच विषप्रयोग झाला? पाकिस्तानात गुगल, युट्युब, ट्विटर सार बंद का केलं ?पाकिस्तानी पत्रकाराने दिली महत्वाची बातमी

spot_img

मुंबई / नगरसह्याद्री : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याच्या विविध बातम्या सध्या अनेक ठिकाणी व्हायरल होत आहेत. काही वृत्तानुसार दाऊदवर पाकिस्तानच्या कराची मधील एका दवाखान्यात उपचार सुरू आहेत ते म्हटले आहे.

त्याची तब्येत खालावली आहे असेही म्हटले जात आहे. दरम्यान अजून पाकिस्तान सरकारच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये सुरू असलेल्या या चर्चांवर कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी आहे.

राजधानी मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात देखील दाऊद इब्राहिम हा मास्टरमाइंड होता. यामुळे भारत सरकार दाऊद इब्राहिमचा गेल्या कित्येक वर्षांपासून शोध घेत आहे. सातत्याने भारत सरकारने पाकिस्तानकडे दाऊद इब्राहिम भारताला सोपवण्यासाठी पाठपुरावा देखील केला होता.

मात्र पाकिस्तान सरकारने दाऊद इब्राहिम पाकिस्तानात राहत नाही असेच सांगितले होते. आता मात्र दाऊदवर विष प्रयोग झाला असून तो कराची मधील एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे वृत्त समोर आल्याने पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे. मात्र सोशल मीडियामध्ये सुरू असलेल्या या चर्चामागे खरच काही तथ्य आहे का ? ही बातमी खरी आहे का ? दाऊदची प्रकृती खरच चिंताजनक बनली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पाकिस्तान सरकारकडून मात्र याबाबत कोणतीच माहिती दिली जात नाहीये. पाकिस्तान हे संपूर्ण प्रकरण एक प्रकारे लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे दाऊदला खरंच विषप्रयोग झाला आहे की नाही? याबाबत पाकिस्तानी पत्रकारांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.

पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार आरजु काजमी यांनी दाऊदवर विष प्रयोग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काजमी यांनी म्हटल्याप्रमाणे, “सध्या पाकिस्तानात इंटरनेट बंद आहे. गुगल, यूट्यूब, ट्विटर सारं काही बंद करण्यात आले आहे. यावरून पाकिस्तान सरकारकडून काहीतरी लपवले जातयं हे स्पष्ट होऊ लागले आहे. पाकिस्तानात इंटरनेट बंद असल्याने तिथे काहीतरी गडबड झाली आहे, पण हे कितपत खरं आहे ते सध्या तरी कळू शकलेले नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पारनेरला पारनेर बाजार तळावर राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन पारनेर/प्रतिनिधी : पारनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या...

कामगाराने लावला मालकाला साडेपाच लाखाला चुना? घडलं असे काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- नगर- दौंड रस्त्यावरील हनुमान नगर समोर असलेल्या एस. आर. कन्स्ट्रक्शनच्या साईटवरून...

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला?; शरद पवार यांचे सूचक विधान..

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्या अगोदर महायुतीने...

विधानसभेला महायुतीची वाढली डोकेदुखी; कारण काय?

पुणे | नगर सह्याद्री:- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षाकडून बैठकांवर बैठका सुरू आहे....