spot_img
अहमदनगरदंडगव्हाळ, सपकाळेंनी खाकीची केली बेअब्रू!; एसपी साहेब, तुमच्या नावाचा होतोय गैरवापर!

दंडगव्हाळ, सपकाळेंनी खाकीची केली बेअब्रू!; एसपी साहेब, तुमच्या नावाचा होतोय गैरवापर!

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पोलिस अधीक्षक म्हणून खमकी भूमिका बजावत असणाऱ्या सोमनाथ घार्गे यांच्या टीममध्ये अनेक खमकी अधिकारी असतानाही जिल्हा पोलिस दलाची मान शरमेने खाली घालावी लागेल असे कृत्य घडत आहे. अभय दंडगव्हाळ आणि कुणाल सपकाळे हे दोघेही सहायक पोलिस निरीक्षक! दंडगव्हाळ हा पारनेर तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांचा जावई झाल्यागत वावरत आहे आणि या गुंडांच्या इशाऱ्यावर सामान्यांना वेठीस धरत आहे. सपकाळे हा अधिकारी कोतवाली पोलिस ठाण्यात लाचेच्या प्रकरणात आरोपी झालाय. कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे हे सामान्यांना आधार वाटेल आणि गुन्हेगारांना धडकी भरेल असे काम करत असताना त्यांच्याच टीममधील सपकाळे याने माती खाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दंडगव्हाळ याने तर वरिष्ठांना वाटा द्यावा लागत असल्याचे जाहीर भाष्य केल्याने त्यातील पहिला वाटेकरी पारनेरचे निरीक्षक समीर बारवकर यांनाच जात असल्याची चर्चा झडू लागली आहे.

एसपी साहेब, तुमच्या नावाचा होतोय गैरवापर!
जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार हाती घेतल्यापासून सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंदेवाल्यांसह गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न चालवला आहे. त्यांचे कामाचे कौतुक होत असताना पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अभय दंडगव्हाळ या अधिकाऱ्याने त्याच्या वसुलीतील वाटा वरिष्ठांना देतोय, असे वक्तव्य केलेय. याशिवाय त्याच्या अनेक आर्थिक आणि नाजूक भानगडींमुळे पोलिस दलाची बेअब्रू चव्हाट्यावर येण्याच्या मार्गावर आहे. आता याबाबत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे काय भूमिका घेतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नगरमध्ये दीड लाखाची लाचखोरी; राजेंद्र गर्गे आरोपी
अहिल्यानगर: नगर शहराचे मध्यवत मानले जाणारे आणि कायम कायदा व सुव्यवस्थेबाबत सजग असणाऱ्या कोतवाली पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे व राजेंद्र गर्गे या दोघांनी माती खाल्याने पोलिस दलाची मान शरमेने खाली गेली. राजकीय पदाधिकारी असणाऱ्या अशोक गायकवाड यांच्या मध्यस्थीने दीड लाखाची लाच स्वीकारतानाच अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली. दरम्यान, सदरच्या घटनेने नगर शहरात मोठी खळबळ उडाली.

कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस दादा राजेंद्र गर्गे यांच्यासह मध्यस्थ अशोक गायकवाड यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. रांजणी, कौडगाव येथील 38 वषय डिझायनर आणि प्रिंटिंग प्रेस व्यवसायिकाने 1.5 लाख रुपये लाच मागितल्याचा आणि स्वीकारल्याचा आरोप केला आहे.

फिर्यादीनुसार, तक्रारदाराच्या आतेभावाने मे 2025 मध्ये त्यांच्या अहमदनगर शहर सहकारी बँक खात्याद्वारे 4 लाख रोख आणि 1.9 लाख रुपये इतर खात्यातून हस्तांतरित केले. ही रक्कम ॲक्सिस बँक खात्यात ट्रान्सफर झाली. याबाबत तक्रारदाराला माहिती नव्हती. 13 ऑगस्ट 2025 रोजी आतेभावाला कोतवाली पोलिसांनी अटक केली.

सपकाळे यांनी तक्रारदाराला आरोपी करून जेलमध्ये टाकू, अशी धमकी दिली. 14 ऑगस्ट रोजी अशोक गायकवाड (वय 71, रा. बिशप लॉईड कॉलनी, सावेडी) यांनी 5 लाख लाचेची मागणी केली, जी तडजोडीअंती 1.5 लाखांवर आली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार केली. श्रीमती नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली 18 ऑगस्ट रोजी पडताळणी कारवाई स्थगित झाली. 20 ऑगस्ट रोजी पुन्हा पडताळणीत गायकवाड यांनी लाचेची मागणी केल्याचे उघड झाले.

गर्गे (वय 57, सपोउनि, कोतवाली) यांनी फोनवर साक्षीदार करू, असे सांगून प्रोत्साहन दिले. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3:38 वाजता गायकवाड यांच्या सावेडीतील घरी सापळा कारवाईत पंच संदीप साबळे यांच्या उपस्थितीत 1.5 लाख रुपये स्वीकारताना गायकवाड यांना पकडले. तोफखाना पोलिसांनी लाचलुचपत कायद्याच्या कलम 7(अ), 12 अंतर्गत गुन्हा (856/2025) नोंदवला आहे.

सेवानिवृत्तीस दीड महिने बाकी असताना लाचेचा मोह!
नगर शहरातील कोतवाली आणि तोफखाना दोन पोलिस ठाण्यात अनेक वर्षे सेवा करताना कायम गोपनिय शाखेत नियुक्ती मिळविण्यात राजेंद्र गर्गे हे यशस्वी झाले. गर्गे हे अनेकदा वादग्रस्त ठरले. त्यांच्याबाबत अनेकदा तक्रारीही झाल्या. मात्र, त्यांनी त्या- त्यावेळी त्या तक्रारी निपटवल्या. त्यासाठी वेगवेगळे मार्गही त्यांनी अवलंबले. गर्गे हे सेवानिवृत्त होण्यास अवघे दीड महिने बाकी होते. दीड महिने बाकी असतानाच दीड लाखाच्या लाच प्रकरणात ते अडकले. लाचेचा मोह आता त्यांना जसा डाग लावून गेला तसाच कोतवाली पोलिस ठाण्याला देखील डाग लावून गेला.

टाकळी ढोकेश्वर परिसरातील गुन्हेगारी अभय दंडगव्हाळमुळे फोफावली!
पारनेर: तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर पोलिस चौकी ही गुन्हेगारांचा राबता असणारी झाली असून या चौकीत सामान्य जनतेला न्याय मिळणेच अवघड झाले आहे. या चौकीशी निगडीत असणाऱ्या अभय दंडगव्हाळ या अधिकाऱ्याचे टाकळी ढोकेश्वर गावासह परिसरातील गुन्हेगारांशी साटेलोटे असून त्यांच्याशी दंडगव्हाळ याची छुपीपार्टनरशीप असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, दंडगव्हाण याच्या आशीर्वादानेच या परिसरातील गुन्हेगारी वाढली असून त्याची खातेनिहाय चौकशी करण्यासह त्याची तातडीने बदली करण्याची मागणी परिसरातील ग्रामपंचायतींमधून ठरावाद्वारे करण्यात आली आहे.

वासुंदेकरांची वज्रमूठ ठरली निर्णायक!
वासुंदे येथील एका युवकास वाळू तस्करांनी बेदम मारहाण करण्याची घटना घडली. या घटनेनंतर वासुंदे ग्रामस्थांनी आंदोलन छेडले आणि टाकळी ढोकेश्वर पोलिस चौकीत कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या अनेक भानगडी थेट चव्हाट्यावर आणल्या. अवैध धंद्यावाल्यांना आणि वाळू तस्करांना दंडगव्हाळ व त्याचे काही हप्तेखोर कर्मचारी कसे पाठीशी घालतात याचा पाढाही वाचला गेला. वासुंदेकरांची गुन्हेगारांच्या विरोधातील ही वज्रमुठ आता परिसरातील गावांना प्रेरणा देणारी ठरली असून गावागावातून आता याबाबत ठराव घेण्यास सुरुवात झाली आहे.

दंडगव्हाळ म्हणतो, साहेबांनाही द्यावा लागतो वाटा!
टाकळी परिसरातील वाळू तस्करांसह अवैध धंदेवाल्यांकडून हप्तेखोरी करतानाच किरकोळ प्रकरणात सामान्यांकडून वसुली करणारा अभय दंडगव्हाळ हा पोलिस दलाला काळीमा फासणारा अधिकारी ठरला आहे. वसुली करताना तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटा द्यावा लागत असल्याचे जाहीरपणे बोलतो. साहेबांना वाटा द्यावा लागतो, असे जाहीरपणे बोलणाऱ्या दंडगव्हाणच्या दाव्यामुळे त्याच्या वसुलीचा वाटा कोणकोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो याची चर्चा झडू लागली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गट, गणांची मोडतोड; कही खुशी कही गम; जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर

जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर | इच्छुकांचे मैदान ठरले अहिल्यानगर |...

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची मोठी कारवाई; गोवंशीय जनावरांची कत्तल करणारी टोळी १ वर्षासाठी हद्दपार

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची तिसरी मोठी कारवाई राहाता । नगर सहयाद्री  ममदापुर (ता. राहाता)...

पत्नीचा खून पतीची आत्महत्या; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना

कोपरगाव / नगर सह्याद्री : कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी...

अजित पवार मुख्यमंत्री होणार, उद्धव ठाकरेंना हलक्यात घेऊ नका; पुण्यातील ज्योतिषांचं भाकीत चर्चेत

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगत आहेत, कारण पुण्यात भरलेल्या ४३ व्या...