spot_img
ब्रेकिंगडान्स पे चान्स! नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकाचे संतापजनक कृत्य! अल्पवयीन मुलीवर..

डान्स पे चान्स! नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकाचे संतापजनक कृत्य! अल्पवयीन मुलीवर..

spot_img

Crime News Maharashtra: नृत्य शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकानेच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संतापजनक बाब म्हणजे याचे व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी तिला दिली गेली होती. तसेच धर्मातर करण्यास भाग पाडून जबरदस्तीने तिचा विवाह लावण्यात आला. या प्रकरणी बलात्कार व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील नराधम आरोपीचे नाव जितेंद्र अनिल संदानशिव (वय ३३, रा. फरशी रोड, अमळनेर) असे आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी सुरत येथील रहिवासी असून, अमळनेर येथे ती शिक्षणासाठी आली होती. फिर्यादीनुसार सन २०१९ मध्ये महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन असल्याने तिने फिटनेस क्लास संचालक असलेल्या जितेंद्रकडे क्लास लावला होता. त्याने पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. बारावीनंतर या मुलीने पुणे येथे फार्मसी कॉलेजला प्रवेश घेतला. संशयिताने तिथेही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध केले आणि २८ जून २०२२ मध्ये त्याने ठाणे येथे विवाह लावला. ऑगस्ट २०२२ मध्ये तिला धर्मातर करायला लावत पुन्हा विवाह लावल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे.

यानंतर २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पीडिता तिच्या माहेरी सुरत येथे निघून गेली. याबाबत अमळनेर पोलिसात संशयिताविरुद्ध कलम ३७६ ३७६ (२) (१), ३७६ (२) (न), ३७६ (३) पॉक्सो कायद्यानुसार कलम ३ (अ), ४ (क), ५ (क), ५ (ल), ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना गंभीर इजा पोहोचवणे, तसेच जीवितास धोका निर्माण करणे, वारंवार बलात्कार करणे, वर्चस्व ठेवण्यासाठी अथवा नियंत्रण ठेवण्यासाठी बलात्कार करणे, हे कलम लागू केलेले आहेत. याप्रकरणी पांडेसरा (सुरत) येथे गुन्हा दाखल आहे. तिथून तो झीरो क्रमांकाने अमळनेरला वर्ग करण्यात आला. संबंधित घटनेचा तपशील आला आहे. त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. चौकशीअंती काय ते निष्पन्न होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...