आमदार आषुतोश काळे उत्तर विभागाचे नामधारी अध्यक्ष | ‘दादा’ अन् ‘मामा’ची अनेकवर्षांपासून दुकानदारी
पाटलाग बातमीचा। शिवाजी शिर्के
कर्मवीर अण्णांना अपेक्षीत असणारे रयत शिक्षण संस्थेचे कामकाज चालू आहे की नाही याबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे. स्वच्छ आणि पारदश प्रशासनाचा अनुभव गाठीशी असणारे माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी हे सध्या या संस्थेचे चेअरमन आहेत. त्यांनी हातात झाडू घेतला असल्याचे समोर येत असले तरी प्रत्यक्षात त्यावर मोठ्या प्रमाणात कृतीची गरज आहे. नगर जिल्ह्याचा विचार केला तर नगर जिल्ह्यात पांडुळे मामा सारख्या एजंटला हाताशी धरत मोठ्या भानगडी झाल्या आहेत. आ. आषुतोश काळे हे उत्तर विभागाचे अध्यक्ष असले तरी त्यांच्या नावाखाली नगर जिल्ह्याची दुकानदारी ‘दादा’ अन् ‘मामा’ या दोघांनी राजरोसपणे चालवली आहे. संस्थेचे चेअरमन म्हणून कामकाज पाहणाऱ्या चंद्रकांत दळवी यांनी स्वतंत्र यंत्रणेकडून सर्च ऑपरेशन केले तर कान्हूरपठारचे प्रकरण म्हणजे हिमनगाचे टोक असल्याचे स्पष्टपणे समोर आल्याशिवाय राहणार नाही.
‘पेनड्राईव्ह’चा खेळ खेळणारा सुहासच!
पिडीत मुलीच्या मोबाईलवर सातत्याने संपर्कात असणारा सुहास गोरडे हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. साहेबराव जऱ्हाड याने अल्पवयीन विद्याथचा विनयभंग केल्याचे समजताच याच सुहास गोरडे याने त्या मुलीचा मोबाईल ताब्यात घेतला आणि त्यातील कॉल रेकॉडग त्याने स्वतंत्र पेन ड्राईव्हमध्ये घेतले. तो पेन ड्राईव्ह त्याने पिडीत मुलीकडे दिला आणि मोबाईलही दिला. मात्र, मोबाईल परत देताना त्यातील संपूर्ण डेटा फॉरमॅट मारुन दिल्याचे लपून राहिलेले नाही.
सुहासला पोलिसी हिसका बसणार का?
सुहास गोरडे याची दीड वर्षांपूव बदली होताच ती रद्द करण्यासाठी शाळा बंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र, तरीही त्याची बदली रद्द झाली नाही. आता या प्रकरणात सुहास गोरडे हाच मास्टरमाईंड आणि पेनड्राईव्ह भरुन देणारा निघाला असताना पोलिस त्यादृष्टीने तपास का करत नाहीत हा प्रश्न आहे. मुलीला मोबाईल कोणी दिला? तिने तिच्या मोबाईलमधील डाटा आणि कॉल रेकॉडग पेन ड्राईव्हमध्ये कसे घेतले? त्यासाठी कोणी मदत केली आणि तिच्या मोबाईलमधील डाटा कोणी फॉरमॅट केला? पेन ड्राईव्ह मध्ये आमचे कॉल रेकॉडग़ घेतले असल्याचे पिडीत मुलगी पोलिसांना सांगत असतानाही तो पेनड्रॉईव्ह तुझ्याकडे कोणी दिला? असे अनेक प्रश्न असतानाही पोलिस त्यादृष्टीने तपास का करत नाहीत हा खरा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
अखेर सुहास गोरडेचा जबाब नोंदविला जाणार!
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात सुहास गोरडे याचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे समोर आले असल्याने आता त्याचा जबाब नोंदविण्याचे काम करावे लागणार आहे. त्यादृष्टीने तपासी अधिकाऱ्यांना सुहास गोरडे याला पत्र देऊन पोलिस स्टेशनला या असे सुचविण्यात आले आहे. दोन दिवसात गोरडे स्वत:हून पोलिसांसमोर यावा आणि तसे त्याने केले नाही तर मग या प्रकरणात आम्ही आमची रास्त भूमिका पार पाडू अशी माहिती पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.
नगर शहरातील एलबीपी शाळा कोणासाठी कुरण?
रयत शिक्षण संस्थेची नगर शहराच्या मध्यवर्ती भागात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या शाळा आहे. या शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला आहे. या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांच्या उड्या असतात. मात्र, मामाच्या खास मजतील मुख्याध्यापकाने येथे प्रवेशाचा बाजार मांडला आहे. वीस ते पंचवीस हजार रुपये प्रवेशासाठी घेतले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. जमा होणारे हे पैसे संस्थेकडे जातात की ‘दादा’ अन् ‘मामा’ वाटून घेतात असा थेट प्रश्न आता रयत परिवारातील सदस्यांकडूनच उपस्थित केला जात आहे.
सस्पेंड झालेला वासनांध जऱ्हाड न्यायालयीन कोठडीत!
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी साहेबराव जऱ्हाड याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडीत चौकशी करण्यात आली असून त्याला सध्या न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गेल्या दोन महिन्यातील त्याचे सीडीआर तपासले तरी अत्यंत विदारक वास्तव समोर येईल. मात्र, ते धाडस पोलिस करणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. दरम्यान, सदर प्रकरणात साहेबराव जऱ्हाड याच्यावर रयत शिक्षण संस्थेने अखेर निलंबनाची कारवाई केली आहे.