कान्हुर पठार मधील तो विकृत शिक्षक अखेर निलंबित
पारनेर / नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील कान्हूर पठार, ता. पारनेर येथील जनता विद्या मंदिर या शाळेतील विकृत वासनांध शिक्षक साहेबराव जऱ्हाड याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सध्या तो पोलिस कस्टडित असला तरी संस्थेचे चेअरमन, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी त्याच्या नीच कृत्याची दखल घेत त्याच्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई केली आहे.
याबाबतच्या आदेशात म्हटले आहे की, विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग, अहिल्यानगर यांनी संस्थेकडे ता. १८ मार्च २०२५ रोजीच्या पत्राने श्री. जऱ्हाड यांनी केलेल्या गैरवर्तणाबाबत चौकशी करुन अहवाल पाठविला आहे. त्यामध्ये शाखेतील ज्येष्ठ उपशिक्षक श्री. जऱ्हाड साहेबराव गोपाळा यांच्या हातून गंभीर स्वरुपाचे नैतिक अध:पतन घडलेले आहे. श्री. जऱ्हाड यांचेवर गुन्हा दाखल होवून अटक झालेली आहे. तरी शासन व संस्था नियमानुसार श्री. जऱ्हाड यांचेवर कारवाई करणेवियषी विनंती आहे व सोबत पारनेर पोलीस स्टेशन येथे श्री. जऱ्हाड यांचे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्याबाबत सहाय्यक पोलीस निरिक्षक, पारनेर पोलीस स्टेशन, पारनेर यांनी संस्थेस जा. क्र. ८८१/२०२५ दि.१८ मार्च २०२५ रोजीचा रिपोर्ट पाठविला आहे, त्यामध्ये दिनांक १६ मार्च २०२५ रोजी पोलीस स्टेशन, पारनेर येथे (गुरनं. २२६/२०२५ बी एन एस) २०२३
कलम ७४, ७५, ७८, ३५१(२) व सह पोस्को कलम ८, १२ प्रमाणे दाखल आहे. सदर गुन्ह्यातील पिडीत मुलगी ही आपले रयत शिक्षण संस्थेची शाळा जनता विद्या मंदिर, कान्हूर पठार, ता. पारनेर, जि.अहिल्यानगर या शाळेत शिक्षण घेत असून आरोपी नामे साहेबराव गोपाळा जऱ्हाड (वय ५८ वर्ष, रा. हिवरेकोरडा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) हा देखील आपले वरील शाळेत शिक्षक या पदावर नेमणूकीस आहे. तसेच नमुद आरोपी नामे साहेबराव गोपाळा जऱ्हाड यास दि.१८ मार्च २०२५ रोजी गुन्ह्याचे तपासामध्ये अटक करण्यात आलेली असून तो सध्या पोलीस कोठडी मध्ये आहे, असे नमूद आहे. त्याअर्थी, तुमचे हातून महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम नं.२८ (५) (अ) गैरवर्तणूक व (ब) नैतिक अध:पाताचे उल्लंघन घडलेले आहे. तसेच तुमचेवर दिनांक १६ मार्च २०२५ रोजी पोलीस स्टेशन, पारनेर गुरनं. २२६/२०२५ (बी एन एस) २०२३ कलम ७४, ७५, ७८, ३५१ (२) व सह पोस्को कलम ८. १२ प्रमाणे दाखल झाला असल्याने तुम्हास संस्थेच्या/शाखेच्या सेवेतून निलंबित करण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे आदेश….
निलंबन कालावधीत तुमचे मुख्यालय श्री साईनाथ हायस्कूल, अळकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर हे राहिल, मुख्यालयाचे ठिकाण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे
परवानगीशिवाय सोडता येणार नाही.
तुम्हास महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतूदीनुसार निलंबन काळातील निर्वाहभत्ता घेण्यास अनुमती देण्यांत येत आहे.
निलंबन काळात तुम्हास दुसरीकडे कोठेही नोकरी करता येणार नाही व तसे अंडरटेकिंग तुम्हास द्यावे लागेल.
४) निलंबन काळात तुम्हास तुमच्या पदाचा राजीनामा देता येणार नाही.
५) निलंबन काळात तुमची कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करता येणार नाही.
6) साहेबराव गोपाळा जऱ्हाड यांचे नावापुढे मस्टरवर ता. १८ मार्च २०२५ पासून “निलंबित अशी नोंद करण्यात यावी. असे या आदेशात म्हटले आहे.