spot_img
महाराष्ट्र१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

१०४ ग्रॅम सोन्यावर डल्ला; प्रोफेसर चौकातील प्रकार

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी दिलेले आठ लाख 30 हजाराचे 104 ग्रॅम (सुमारे 10 तोळे) सोने कारागिराने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंगवी ज्वेलर्सच्या सावेडीतील प्रोफेसर चौकातील दुकानात हा प्रकार घडला आहे.

दरम्यान, या प्रकरणी शिंगवी ज्वेलर्स प्रा. लि. चे मॅनेजर अमृत जिवराज रावल (वय 51, रा. बुरूडगाव रस्ता, सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स, अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी भिमराव पाटील (रा. सराफ बाजार, अहिल्यानगर) याच्याविरूध्द बुधवारी (22 जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृत हे गेल्या सात वर्षांपासून शिंगवी ज्वेलर्सच्या प्रोफेसर कॉलनी चौकातील दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांनी 19 व 20 डिसेंबर 2024 रोजी शिवाजी पाटील याला सोन्याचे दागिने तयार व दुरूस्ती करण्यासाठी 104 ग्रॅम वजनाचे सोने दिले होते.

यामध्ये 38 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन, 17 ग्रॅम वजनाचे एक गंठण, 29 ग्रॅम वजनाचे एक नेकलेस, आणि 20 ग्रॅम वजनाचे एक ब्रासलेट असे दागिने बनवण्यास सांगितले होते. दरम्यान, शिवाजी पाटील हा मागील 10-12 वर्षांपासून शिंगवी ज्वेलर्ससाठी काम करत असल्याने त्याच्यावर दुकान मालक व मॅनेजर यांचा विश्वास होता.

दोन-चार दिवसात सोन्याचे दागिने तयार करून देण्याचे त्यांच्यात ठरले होते. पण शिवाजीने ठरलेल्या वेळेत दागिने परत केले नाहीत.फिर्यादी अमृत यांच्या म्हणण्यानुसार, शिवाजीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने सुरूवातीला वेळ मागितली, पण नंतर त्याने फोन उचलणे बंद केले आणि दुकानात येणे टाळले.

यावरून अमृत यांना शंका आली की, शिवाजीने विश्वासघात करत हे सोन्याचे दागिने परत न करण्याचा निर्णय घेतला आहे. तोफखाना पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली असून अधिक तपास पोलीस अंमलदार चांगदेव आंढळे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेरमध्ये गुंडगिरी, शहराची विस्कटलेली घडी सुरळीत करणार; आमदार तांबे काय म्हणाले पहा

बाळासाहेब थोरात नेतृत्वात सेवा समिती संगमनेरच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार सत्यजित तांबे | शहराची विस्कटलेली...

वाळू तस्करांची दहशत संपुष्टात!; पोलिसांनी काय केले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री राहुरी तालुयात सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवून बेकायदेशीर वाळू तस्करी करणारे तसेच...

पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले; अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेतून...

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

आयुक्त यशवंत डांगे | २७ नोव्हेंबरपर्यंत हरकतींसाठी मुदत अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक...