spot_img
ब्रेकिंगराज्यभरात दहीहंडीचा जल्लोष; गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज

राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष; गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यभरात आज दहीहंडीनिमित्त मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात आज दिवसभर राज्यभरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. दहीहंडी निमित्त अनेक बालगोपाळ तसेच गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.

ठाण्यासह मुंबईतील दहीहंडी उत्सव नेहमीच चर्चेचा असतो. त्यामुळे यंदा दहीहंडी पथकांकडून थरांवर थर लावण्यास कोण सरस ठरणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आज मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस असूनही गोविंदा पथकांचा जराही उत्साह कमी झालेला नाही.

विशेष म्हणजे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पालिकेच्या निवडणुकी निमित्त अनेक राजकीय पक्षाकडून भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी राजकीय नेते व सेलिब्रिटींची उपस्थिती राहणार आहेत. महिला गोविंद पथक हे या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले आहे.

पोलीस बंदोबस्त तैनात
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौकातील शिंदे-ठाकरे गटाच्या समोरासमोरील दहीहंड्या या विशेष आकर्षण ठरणार आहेत. दरम्यान, दहीहंडीनिमित्त होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी SRPF तुकडीसह 600 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धर्माच्या नावाखाली… ; घुलेवाडी येथील घटनेवर बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

संगमनेर / नगर सह्याद्री घुलेवाडी सप्ताह जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे....

दारू पिण्याची शर्यत बेतली जीवावर; एकाचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री - सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे रविवारी (१७ ऑगस्ट) घडलेल्या...

नगरमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला सापळा

कृष्णा लॉजवर छापा | तिघांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरातील बुरुडगाव रोडवरील कृष्णा लॉजवर कोतवाली...

पारनेरमध्ये बिबट्याचा हैदोस, कुठे घडला प्रकार पहा

निघोज | नगर सह्याद्री बिबट्याचा निघोज, गुणोरे, गाडिलगाव, कुंड, खंडोबा पाऊतके परिसरात हैदोस सुरू असून...