spot_img
ब्रेकिंगदादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! 'वेळ आल्यावर..';विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

spot_img

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. अशातच जागावाटप आणि उमेदवारांची चाचपणी या घडामोडींना वेग आला आहे. अशातच राज्यात काही ठिकाणी फुटीनंतर वेगळे झालेले एकाच पक्षाचे दोन वेगवेगळे गट आमनेसामने लढण्याच्या तयारीत आहे. या अनुषंगाने मोठी तयारी देखील सुरू आहे.

मात्र, जुन्नर तालुक्यात विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अतुल बेनके ( MLA Atul Benke) यांनी मोठं वक्तव्य केल्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात कुठं असं घडलं नाही. मात्र, जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघपणाने पुढे जाणार कारण पवार साहेबांचा हात माझ्या पाठीमागे आहे, असं वक्तव्य अतुल बेनके यांनी केलं आहे. अशातच बेनकेंच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर वारंवार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती देखील समोर आली होती.

काय म्हणालेत अतुल बेनके?
उद्या पहाटे ओझरला पहाटे अभिषेक करून आपण प्रचाराला सुरूवात करत आहोत. आता मागे हटायचं नाही. आपण एका दिलाने आणि एका विचाराने राष्ट्रवादी काँग्रेस पुढे घेऊन जायचं आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे झाले नाही मात्र, जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघपणाने पुढे जाण्यात यश प्राप्त करेल. जुन्नर तालुक्यात सब एक है. आम्ही एक विचाराने पुढे जाणार आहोत. अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये घड्याळ म्हणून हा पक्ष पुढे जाणारच आहे. मात्र, शरद पवार ही हात माझ्या पाठीमागे उभा आहे. तो कसा आहे ते वेळ काळ आल्यावर सांगेल असं मोठं वक्तव्य अजित पवार गटाचे नेते आणि विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी केलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...