spot_img
अहमदनगर'दादा' खिंडकर वाल्मिक 'आण्णा' पेक्षा मोठा गुंड! 'बड्या' नेत्याने बीडचा गुन्हेगारीचा फोडला...

‘दादा’ खिंडकर वाल्मिक ‘आण्णा’ पेक्षा मोठा गुंड! ‘बड्या’ नेत्याने बीडचा गुन्हेगारीचा फोडला बॉम

spot_img

Beed Crime: दादा खिंडकर वाल्मिक कराड याच्यापेक्षा मोठा गुंड आहे. गावात त्याची मोठी दहशत आहे. दादा खिंडकर टोळी चालवतो. जीवे मारण्याची धमकी देतो, असा खळबळजनक दावा ठाकरे गटातील बीडचे जिल्हाप्रमुख परमेश्र्वर सातपुते यांनी केला आहे. तसेच खिंडकर याचा आका राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील नेते आहेत, असाही खुलासा सातपूते यांनी केला आहे.

तरूणाला मारहाण प्रकरणी दादा खिंडकर पोलिसांसमोर शरण गेला आहे. पोलिसांनी दादा खिंडकरला ताब्यात घेतलं आहे. तेव्हापासून दादा खिंडकर कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. दादा खिंडकरच्या नावावर २० ते २२ गुन्हे दाखल आहेत. राजकीय नेत्यांचा वापर करून तो इतरांना अडकवायचा तसेच, त्यांच्या नावावर खोटे गुन्हे दाखल करायचा, असा दावाही सातपूते यांनी केला आहे.

दादा खिंडकरला राजकीय वरदहस्त आहे. खिंडकरचा आका राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील नेते अमरसिंह पंडित आहेत. त्यांच्यामुळे खिंडकरवर चार गुन्हे दाखल झाले नाहीत, असा मोठा खुलासाही सातपूते यांनी केला आहे. अमरसिंह पंडित आणि धनंजय मुंडे यांनी सपोर्ट केलं नसतं तर, दादा खिंडकर जेलमध्ये असता. दादा खिंडकरला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला नेत्यांनी कॉल केले आहेत’, असंही सातपूते म्हणाले.

गावात मतदान होत असतानाही खिंडकर आणि त्याच्या टोळक्याची गुंडगिरी चालते. खिंडकर स्वतः मतदान करतात आणि जनतेच्या फक्त बोटाला शाई लावतात. तीन गावात खिंडकर आणि त्याच्या टोळक्याची मोठी दहशत आहे. या दहशतीखाली गावातील नागरिक राहत आहेत’, अशी माहिती सातपूते यांनी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....