जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड येथे बर्फ कारखान्यात गेल्या आठ वर्षापासून कामाला असलेल्या परप्रांतीय कामगारासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी विजय ओमप्रकाश चौरासिया (वय-32 वर्ष, रा. पडरोना उत्तरप्रदेश, हल्ली रा. खर्डा जामखेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश आप्पा क्षीरसागर, मनोज सुरेश जगताप, शुभम अमृत पिंपळे सर्व (रा. जामखेड ) याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी; मूळचे उत्तरप्रदेश येथील विजय चौरासिया कामानिमित्त खर्डा ता जामखेड येथे कटूंबासह वास्तव्यास आहे. सुमारे 08 वर्षापासुन महावीर बर्फ कारखान्यामध्ये कामाला आहे.( दि. 06) रोजी दुपारच्या दरम्यान ते महावीर बर्फकारखान्यामध्ये काम करत असताना वरील तीन आरोपी महावीर बर्फ कारखान्यात आले.
त्यांनी शिवीगाळ मारहाण करु लागले. त्यातील सुरेश क्षीरसागर यांने त्याचे हात पाय तोडा म्हणजे कारखाना बंद पडेल असे म्हणत वरिल तिघांनी डोक्यावर मारहान करुन जखमी केले. आरडाओरडा केल्यानंतर तिघे तेथुन पळुन गेले. असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.