spot_img
अहमदनगरबाप रे! १० लाखांचे घेतले 'एवढे'; सावकारकीचा गुन्हा दाखल

बाप रे! १० लाखांचे घेतले ‘एवढे’; सावकारकीचा गुन्हा दाखल

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
उद्योजक महेश सुरेश गावडे (वय 30 रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांचे अपहरण करणाऱ्या निखिल राजकुमार लून (रा. नवजीवन कॉलनी, मार्केटयार्ड जवळ, अहिल्यानगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 39 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अल्ताफ अब्दुल कादर शेख (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान, निखिल याने महेश यांचे प्लॉटच्या व्यवहारातून अपहरण केले होते. त्याच प्रकरणात सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी तक्रार महेश यांनी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे केली होती. तक्रार अर्जाची चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश यांनी 9 मार्च 2021 रोजी निखिल कडून 10 टक्के दराने 10 लाख तातडीच्या कामासाठी घेतले होते. त्याच्या सुरक्षिततेसाठी महेश यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे वडगाव गुप्ता येथील प्लॉटचे रजिस्टर साठेखत तयार केले होते.

यानंतर, महेश यांनी 20 सप्टेंबर 2022 पर्यंत निखिल च्या खात्यात आरटीजीएसव्दारे 34 लाख 25 हजार रूपये जमा केले. तरीही, साठेखत रद्द करण्यात आले नाही. महेश यांनी 22 मार्च 2024 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार केली. चौकशी अंती निखिलने सदर रक्कम सावकारी स्वरूपात घेतली आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे उपनिबंधक सहकारी संस्था यांनी अल्ताफ अब्दुल कादर शेख यांना सरकार तर्फे फिर्याद देण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आरक्षण जाहीर; संभाव्य उमेदवार लागले तयारीला!

आ. संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांची सहमती एक्सप्रेस नगर महापालिकेत विरोधकांना...

महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ – मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?

मुंबई / नगर सह्याद्री - Weather Update: देशभरात सध्या हवामान वेगाने बदलताना दिसतंय ....

निवडणुकीच्या तोंडावर उबाठा शिवसेनेत फेरबदल; जिल्हाप्रमुखपदी कुणाची निवड?

लोकसभा संघटकपदी गाडे, दक्षिण जिल्हाप्रमुखपदी दळवी, महानगर प्रमुखपदी काळे यांच्या निवडी अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिवसेना...

पारनेर नगराध्यक्षपदाच्या निवडीत दडपशाही; महायुतीचे पत्रकार परिषदेत आरोप, हंगा वरून कारभार पाहणाऱ्यांना धडा शिकवणार!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगराध्यक्ष पदाच्या निवडीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुरा...