मुंबई । नगर सहयाद्री-
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची लेक बॉलिवूडची ‘दबंग’ स्टार अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. सोनाक्षी आणि झहीर यांना इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत अशातच सोशल मीडियावर सोनाक्षी कोणता लूक कॅरी करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नापूर्वी शनिवारी संध्याकाळी तिच्या घरी ‘रामायण’ पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सोनाक्षीची आई पूनम सिन्हा यांच्या उपस्थितीत ही पूजा पार पडली. दरम्यान, वधूसाठी कपडेही आले. सोनाक्षीच्या घराबाहेर एक कार थांबली, ज्यामध्ये तिचा लग्नाचा लेहेंगा ठेवण्यात आला होता. रिसेप्शनसाठी सोनाक्षी पिच कलरचा घागरा वेअर करणार आहे. ओढणी आणि घागरा वेअर करणार असल्याचे कळत आहे. यावेळी आणखी काही आऊटफिट्सही पाहायला मिळत आहे.
‘हे’ सेलिब्रिटी राहणार उपस्थित? 
मुंबईतील दादर येथील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होणार आहे. शिल्पा शेट्टीच्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. लग्नासाठी हेमा कुरेशी, हनी सिंग, सलमान खान, हिरामंडी वेबसीरीजची स्टारकास्ट, तसेच सोनाक्षी आणि झहीरची जवळची मैत्रीण हुमा कुरेशी आणि मित्र आयुष शर्मा आणि वरुण शर्मा देखील रिसेप्शनला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. या रिसेप्शन पार्टीमध्ये बॉलिवूडमधील आणखी कोणकोणते सेलिब्रिटी उपस्थिती लावणार हे पाहणं औत्सुतक्याचं ठरणार आहे.



 
                                    
