spot_img
ब्रेकिंग'रेमल' चक्रीवादळ धडकणार! महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? हवामान विभागाने दिली मोठी माहिती,...

‘रेमल’ चक्रीवादळ धडकणार! महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? हवामान विभागाने दिली मोठी माहिती, पहा..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
आज रविवारी दि. २६ मे रोजी रात्रीच्या सुमारास बंगालच्या उपसागरात ‘रेमल’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे, ‘रेमल’ ‘चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने किनारपट्टीवर धडकू शकते. या काळात समुद्रात १.५ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे हवामान खात्याने मच्छिमारांना २७ ‘मे’च्या सकाळपर्यंत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.

‘रेमल’ चक्रीवादळामुळे, कोलकाता विमानतळावरील विमानसेवा रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २१ तासांसाठी बंद राहणार आहे. त्याच बरोबर बंगाल सरकारने शनिवारी एक बैठक घेतली आणि चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहू कामे १२ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

हवामान खात्याने २६-२७ मे रोजी दक्षिण २४ परगणामध्ये १०० ते ११० किमी प्रतितास आणि उत्तर २४ परगणामध्ये ताशी ९० ते १०० किमी प्रतितास ते ११० किमी प्रति तास वाऱ्याचा वेग वाहण्याचा इशारा दिला आहे. विभागाने कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...