spot_img
अहमदनगरलोकप्रतिनिधीमुळे तालुक्याची संस्कृती बिघडली 'आक्रमक भूमिका घेण्याची गरज..'; महायुतीच्या बैठकीत 'या' नेत्याने...

लोकप्रतिनिधीमुळे तालुक्याची संस्कृती बिघडली ‘आक्रमक भूमिका घेण्याची गरज..’; महायुतीच्या बैठकीत ‘या’ नेत्याने व्यक्त केले मत

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री:-
तालुयाच्या राजकारणात वेगळा पायंडा पडत आहे. तालुयाची राजकीय संस्कृती ही बिघडली आहे. त्याला बिघडवणारे समोरचे लोकप्रतिनिधी हे जबाबदार असून या पुढील काळात तालुयात काम करत असताना सर्वांनी आक्रमक भूमिका घेऊन काम करणे गरजेचे आहे. शंकरराव काळेंपासून माजी आमदार वसंतराव झावरे, विजयराव औटी, नंदकुमार झावरे, बाबासाहेब ठुबे यांच्या काळातील वैचारिक बैठक आता तालुयात राहिली नाही. ती बिघडवण्याचे काम सुरू आहे. सहकार संपवण्याचे काम सुरू आहे. तालुका वाचला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ज्येष्ठ नेते माजी सभापती काशिनाथ दाते सर यांनी पारनेर येथे झालेल्या महायुतीच्या बैठक मेळाव्यात मत व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन महायुतीच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे दाते यांनी सांगितले. पारनेर येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये माजी खासदार सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर या ठिकाणी विचारमंथन करण्यात आले व येणार्‍या विधानसभा व निवडणुकांमध्ये पक्ष संघटनेमध्ये व महायुतीमध्ये कशा पद्धतीने संघटनात्मक नियोजन करून निवडणुका जिंकणे सोपे होईल यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, जेष्ठ नेते काशिनाथ दाते, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी सभापती गणेश शेळके, शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष बंडू रोहकले, भाजप नेते सुनील थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुषमा रावडे, सोनाली सालके, मा. जि. प. सदस्य वसंत चेडे, सचिन वराळ पाटील, दिनेश बाबर, नगरसेवक पै. युवराज पठारे, सरपंच मनोज मुंगसे, अमोल कर्डीले, चेअरमन ऍड. बाबासाहेब खिलारी, सागर मैड, शिवाजी खिलारी, संतोष शेलार, किरण कोकाटे, संग्राम पावडे, शिवाजी रोकडे, सुभाष दुधाडे, डॉ. अजय येणारे, मा. सरपंच बाळासाहेब रेपाळे, भाऊसाहेब टेकूडे, वसंत मोरे, सुभाष सासवडे, कैलास नर्हे, संदीप औटी, डॉ. रामचंद्र थोरात, गंगाराम कळमकर, सुभाष करंजुले, लहू रावडे, विकास रोकडे, मा. सरपंच साहेबराव वाफारे, संजय बोरुडे, सावकार लांडे, आदी राष्ट्रवादी भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीत चुकीच्या अफवा
लोकसभा निवडणुकी दरम्यान समोरच्या उमेदवाराने चुकीच्या पद्धतीने निवडणुकीमध्ये अफवा पसरवून मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करून मतदारांची फसवणूक केली आहे. यापुढे निवडणुकांमध्ये जनता नक्कीच जागा दाखवून देईल. काल परवा कांदा दुधाच्या भावासाठी आंदोलन करणारे खासदार दिल्लीमध्ये संसदेसमोर झालेल्या आंदोलनामध्ये कांद्याचे भाव वाढले म्हणून आंदोलन करत होते. अशा पद्धतीने त्यांनी मतदारांची फसवणूक केली आहे.
– राहुल पाटील शिंदे (तालुका अध्यक्ष भाजप)

नगर दक्षिणमध्ये निवडून आलेल्या खासदारांची काय उंची आहे हे आम्हाला चांगली माहित आहे. त्यामुळे आमच्यावर टीका करताना त्यांनी विचारपूर्वक टीका करावी.
– सचिन पाटील वराळ

महायुतीच्या उमेदवाराबरोबर राहणार
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात यापुढील काळात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती जो उमेदवार देईल त्या उमेदवाराबरोबर मी राहणार आहे.
– सुजित झावरे पाटील (माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...