spot_img
ब्रेकिंगढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात; काय होतोय परिणाम पहा

ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात; काय होतोय परिणाम पहा

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
सध्या थंडीचा कडाका कमी होऊन ढगाळ हवामानात वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम विविध पिकांवर होत आहे. धुकं वाढल्यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढवून श्रीगोंदा तालुयातील पिके धोयात आली आहे. फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.
उत्पादन वाढीच्या शेतकर्‍यांच्या नियोजनाला कायम निसर्गाच्या लहरीपणाचा अडसर ठरलेला आहे. जी स्थिती खरीप हंगामातील पिकांची झाली होती. त्यापेक्षा विदारक अवस्था ही रब्बी हंगामात पहावयास मिळत आहे. सातत्याने होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका आहे. तसेच शेतकर्‍यांची मेहनत आणि कष्टही निष्फळ ठरत आहे. रब्बी हंगामातील बदललेल्या पीक पद्धतीमुळे मुख्य पिकांची जागा ही गहू, हरभरा व कांदा पिकाने घेतली आहे. तर याच पिकावर अधिकचा परिणाम झालेला आहे.सध्याच्या वातावरणातील बदलांचा सर्वाधिक फटका कांदा, हरभरा व गहू पिकाला बसत आहे. सकाळचे धुके अन दिवसभर ढगाळ वातावरण यामुळे पिकांवर किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेषत हरभरा या पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

दरम्यान रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू, कांदा इत्यादी पिके ढगाळ वातावरणामुळे बाधित होताना दिसत आहेत. ज्वारी व हरभर्‍याच्या पिकावर अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांनी या पिकावर विविध प्रकारच्या रोग नियंत्रण फवारणी सुरू केले आहेत. वातावरणातील या चढउतारामुळे रब्बी हंगामातील अनेक पिके बाधित होताना दिसत आहे. श्रीगोंदा तालुयात कांद्याचे विक्रमी लागवड झाली आहे. कांदा पीक हे नगदी पीक असल्याने तीन ते चार महिन्यात हे पीक हाती लागते. सध्या कांद्याला चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक हातभार लागला. त्यामुळे शेतकरी कांदा पिकांकडे मोठ्या प्रमाणात शेती उद्योग करताना दिसत आहेत. परंतु, निसर्गाच्या लहरी पणामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

चांगले पैसे मिळतील या आशेवर शेती
खते, औषधे महाग झाली आहेत. निसर्गाचा लहरीपणा सुरु आहे. शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. कांद्याला सध्या बाजार आहे परंतु, कांदा हातात येईल तेव्हा बाजार राहील की नाही माहित नाही. पिक निघून चांगले पैसे पदरात पडतील या आशेवर शेतीची मेहनत घेतली जात आहे. शेती पिकविणे शेतकर्‍याच्या हातात आहे परंतु, बाजार भावाचे हातात नाही असे श्रीगोंद्यातील शेतरी सतीश पाडळे यांनी नगर सह्याद्रीशी बोलतांना सांगितले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धनंजय मुंडेंचा पत्ता कट? बीडच्या पालकमंत्रीपदासाठी कोणाला पसंती, पहा

बीड / नगर सह्याद्री - Ajit Pawar | राज्यातील खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी...

थंडीची लाट; दाट धुके, हवाई, रेल्वे वाहतूकीचा खोळंबा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - देशात सध्या सर्वत्र थंडी आहे. मात्र, राजधानी दिल्लीतील परिस्थित वेगळी...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; त्या दोघांना पुण्यातून उचलले, आंधळे फरार

बीड / नगर सह्याद्री - Beed Sarpanch Murder Case: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष...

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचे निधन

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष...