spot_img
अहमदनगरघराणेशाहीवर टीका करणार्‍यांची घरात पद घेण्यासाठी धडपड; दातेंची लंकेंवर टीका, काय म्हणाले...

घराणेशाहीवर टीका करणार्‍यांची घरात पद घेण्यासाठी धडपड; दातेंची लंकेंवर टीका, काय म्हणाले पहा…

spot_img

देवीभोयरे परिसरात प्रचारफेरी

पारनेर | नगर सह्याद्री –
राजकारण, समाजकारणात सत्तेचे विकेंद्रीकरण गरजेचे असून, पारनेर विधानसभा मतदारसंघात मात्र एकाच घरात दोन्ही पदे मिळवण्याची धडपड चालू आहे. त्यामुळे जे एकेकाळी घराणेशाहीवर टीका करत होते, तेच आता एकापेक्षा अधिक महत्त्वाची पदे आपल्या घरात घेत असल्याची टीका महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी केली.

तालुयातील देवीभोयरे येथे मंगळवारी प्रचारदौर्‍याप्रसंगी दाते बोलत होते. यावेळी उपसरपंच विकास सावंत, गोपीनाथ बेलोटे, सामाजिक कार्यकर्ते बाबूराव मुळे, ज्ञानदेव बेलोटे, रोनू भाऊ सगर, प्रकाश मोरे, दादामिया शेख, सुजाता गाजरै, वंदना बेलोटे, मंगल बेलोटे, विजय बेलोटे, वसंत गायकवाड, सत्यवान बेलोटे, शरद बोरुडे, अरविंद गजरे, लक्ष्मण धोत्रे, शहानी बेलोटे आदी उपस्थित होते.

दाते म्हणाले, राज्य सरकारने मुलींना पहिली ते पदवीधरपूर्यंतचे सर्व शिक्षण मोफत केले आहे. हा निर्णय सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांना अतिशय चांगला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे.

महायुती सरकारने शेतकर्‍यांचे वीजबिल माफ केले असून, पंतप्रधान सन्मान योजना आणली आहे. देवीभोयरे गावात एक रुपयात विमा भरलेल्या शेतक-यांना पावणेदोन कोटी रुपये मिळाले, तर तालुयाला १२१ कोटी विमा रक्कम मिळाली. आता मतभेद बाजूला ठेवा, ही निवडणूक मतदारसंघाच्या अस्तित्वाची आहे. येणार्‍या काळात आपसात भांडणे लावण्याचे काम होईल. आमिषाला बळी पडू नका, निर्भयपणे मतदान करा, असे आवाहन दाते यांनी केले. सूत्रसंचालन शिवसेना विभाग प्रमुख अमोल गजरे यांनी केले. आभार शरद बोरुडे यांनी मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावधान! महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं सावट! पुढील काही दिवस पावसाचे, IMD इशारा..

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्रावर दुहेरी चक्रीवादळाचं संकट आलं आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ आणि...

सातारा महिला डॉक्टर मृत्यूप्रकरणात नवा ट्विस्ट; आई-वडिल समोर, पोलीस अन् राजकीय दबावावर भाष्य

सातारा / नगर सह्याद्री - जिल्ह्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या...

ट्रस्ट जमीन प्रकरणी जैन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अशा आहेत मागण्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त...

क्षुल्लक कारणावरून महिलेवर चाकूहल्ला; नगरमध्ये धक्कादायक प्रकार

भावासह कुटुंबालाही मारहाण | बुरूडगाव येथील घटना अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुयातील बुरुडगाव येथे मला...