मुंबई। नगर सहयाद्री-
जानेवारी महिन्याच्या सुरवातीलाच हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे.गेल्या २४ तासात अनेक ठिकाणी पावसानी जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात पुढील २४ तासात पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
उत्तर भारतात गेल्या २४ तासांत कडाक्याची थंडी पडली असून दक्षिण भारतात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान बदलताना दिसत आहे. पाऊस आणि धुक्याचा कहर सुरु आहे.
अशातच अरबी समुद्रात बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे पुढील २४ तासात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तामिळनाडूच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो. कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील २४ तासात रिमझिम पावसाची शक्यता आहे.
गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता असून कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.