spot_img
ब्रेकिंगबाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले 'अहिल्यानगर'

बाजारात पोहचण्याआधीच संकट; पिकअपच्या अपघाताने हादरले ‘अहिल्यानगर’

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील आठवडे बाजारासाठी जात असताना सोमवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक पिकअप वाहन उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात २६ परप्रांतीय मजूर जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.कर्जत-कुळधरण-श्रीगोंदा मार्गावर, नेवसे यांच्या डेअरीसमोर हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ४२ एक्यू ५९४३ या क्रमांकाच्या पिकअपमधून परप्रांतीय मजूर आठवडे बाजारासाठी कर्जत येथे येत होते. यावेळी पिकअपचे एक्सेल तुटल्याने चालक अशोक दत्तात्रय धांडे (वय ४०, रा. जामदारवाडा, ता. कर्जत) याचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन उलटले. अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉ. सागर कोल्हे, डॉ. विद्या व्हरकटे आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले.

गंभीर जखमींपैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले. उर्वरित जखमींवर कर्जतमध्ये उपचार सुरू आहेत. शेतकऱ्यांनी मुरघास (गोठ्यांसाठी चारा) करण्यासाठी या मजुरांना मध्य प्रदेशमधून बोलावले होते. सोमवारचा आठवडे बाजार असल्याने मजूर पिकअपमधून कर्जतकडे येत असताना हा अपघात घडला. जखमींमध्ये लहान मुलं, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे, अशी माहिती मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिल्लीगेट परिसरात राडा; दुचाकी फोडल्या, तरुणांना घेरलं, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पूर्वीच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दिल्लीगेट परिसरात राडा घातल्याची...

दिल्लीत भीषण स्फोट; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लेखोरांना तीव्र शब्दांत इशारा; एकालाही सोडणार नाही..

नवी दिल्ली | वृत्तसंस्था देशाची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटामुळे हादरली. ऐतिहासिक लाल किल्ल्‌‍याजवळील लाल किल्ला...

टाकळी ढोकेश्वरचा वाळू माफिया गजाआड ;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

१५ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू माफियाविरुद्ध...

‘मुलाचे बरेवाईट झाल्यास सोडणार नाही’; विद्यार्थिनीला धमकावणे पडले महागात, वाचा प्रकरण

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर प्रेमसंबंधासाठी बळजबरी, सतत पाठलाग आणि...