spot_img
अहमदनगरएमआयडीसीमधील गुन्हेगारी रोखा; एसपींना 'यांनी' घातले साकडे

एमआयडीसीमधील गुन्हेगारी रोखा; एसपींना ‘यांनी’ घातले साकडे

spot_img

आमी संघटनेच्या माध्यमातून उद्योजकांचे जिल्हाधिकारी, एसपींना साकडे
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
एमआयडीसी मधील विविध प्रश्न, गुन्हेगारी व अवैध धंदे बंद होण्यासाठी आमीच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी एमआयडीसीत वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. तर अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी लावून धरली.

एमआयडीसीमध्ये अवैध धंदे चालविणारे अनाधिकृत टपऱ्या वाढल्या असताना गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या टपऱ्यांमध्ये दारू, चरस, गांजा, अफू असे अमली पदार्थ विकले जातात. त्याचे सेवन करून गुन्हेगारीचे प्रमाण या परिसरात वाढत आहे. यामुळे एमआयडीसी मधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा उद्योजकांनी प्रश्न उपस्थित केला. सन फार्मा-निंबळक रस्ता काम पूर्ण करावे, अहिल्यानगर औद्योगिक वाढीसाठी नवीन मोठे उद्योग (पॅरेंट कंपन्या) आणणे, पंपिंग स्टेशन ते एमआयडीसी नवीन पाईप लाईन टाकणे, ग्रामपंचायत टॅक्स हा एमआयडीसी कडे वर्ग करावा, टॅक्स आकारणी कंपनीच्या बीबीसी प्रमाणे आकारण्यात यावी, एम ब्लॉक मध्ये रस्त्यावरील कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी, महावितरणचे नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात जागा मिळावी, एल ब्लॉक येथे पोलीस चौकी उभारावी, त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी मांडला.जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, एमआयडीसी मधील उद्योजक हा नगर शहराचा अर्थिक कणा आहे. त्यांच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळतो. नुकत्याच मुख्यमंत्री यांनी दावस येथे झालेल्या मिटिंगमध्ये आपल्या जिल्ह्यासाठी पाच ते सहा हजार कोटी रुपये आणले आहेत.

महिन्यातून एकदा झूम मीटिंग करून आपल्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यास मदत होईल. एमआयडीसी मधील उद्योजकांच्या तक्रारी सकारात्मक रित्या घेतल्या जातील, असे त्यांनी आश्वासन दिले.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एमआयडीसी मधील चोरी, खंडणी, धमकी हा गंभीर प्रश्न आहे. सर्वात प्रथम उद्योजकांनी जो कोणी गुन्हेगार आहे, त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली पाहिजे. गुन्हेगारी रोखण्यासाठी उद्योजकांनी पुढे आले पाहिजे.रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांसाठी बॅरिकेटिंग करणे, टपऱ्यांचे अतिक्रमण हटवून अवैध धंद्यांवर कारवाई करणाचे त्यांनी आश्वासन दिले.

रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढविण्याचे स्पष्ट केले. तर कंपनीच्या कॅम्पसमध्ये व बाहेरील बाजूस सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत असे एसपींनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले, प्रांत सुधीर पाटील, किशोर जाधव, शेरकर, आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, संजय बंदिष्टी, राजेंद्र कटारिया, सुमित लोढा, रवींद्र बक्षी,सतीश गवळी, सागर निंबाळकर, आकाश जोशी, दीपक नागरगोजे, सचिन पाठक, प्रफुल्ल पारख आदी आमी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...