spot_img
अहमदनगरCrime: पोलीसांची खांडगांव शिवारात मोठी कारवाई! एक इसम करत होता असं...

Crime: पोलीसांची खांडगांव शिवारात मोठी कारवाई! एक इसम करत होता असं काही….

spot_img

Ahmednagar Crime: अवैधरित्या विनापरवाना देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्यास श्रीगोंदा पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून देशी विदेशी दारुचा साठ्यासह ७ लाख ७५ हजार ४६० रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पो. नि. किरण शिंदे यांना गुप्त् बातमीदारामार्फत खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण रोडवर एक अनोळखी इसम अवैधरित्या देशी-विदेशी दारुच्या बॉक्सची विनापरवाना विक्री करत असल्याची माहिती मिळाली. लागलीच पो. नि. किरण शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाला याबाबत सूचना केल्या. सदरील पथकाने तात्काळ कारवाई करून हॉटेल यशोदा समोरील रोडवर सापळा रचला.

त्यावेळी एक इसम सुझुकी कंपनीच्या कॅरी वाहनातून विनापरवाना देशी-विदेशी दारु विक्री करत असल्याचे आढळले. पोलिसांनी अनोळखी इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची कॅरी वाहन आणि २ लाख ७५ हजार ४६0 रुपये किमतीची देशी-विदेशी दारु हस्तगत करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पो. उपनिरीक्षक संपत कन्हेरे, रोना/गोकुळ इंगावले, पोकों/संदिप राऊत, पोकों/संदिप शिरसाठ व पोकों/आनंद मैड यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...