अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारू विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला. यात एमआयडीसी परिसरातील तीन अवैध दारु विक्रेत्यांवर छापे टाकून ७३ हजार ४०० रुपयांचा अवैध दारू व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांवर छापे घालून तीन जणांना पकडले.
त्यांच्याकडून ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस अंमलदार गणेश लोंढे, बिरप्पा करमल, शाहीद शेख, गणेश धोत्रे, विजय ठोंबरे, बाळासाहेब नागरगोजे व रणजीत जाधव यांनी बजावली आहे.