spot_img
आरोग्यCovid 19 : सावधान ! चव व वासच नव्हे तर आवाजही हिरावून...

Covid 19 : सावधान ! चव व वासच नव्हे तर आवाजही हिरावून घेईल कोरोना, पहा ‘हा’ रिपोर्ट

spot_img

नवी दिल्ली / नगर सह्याद्री
कोरोना व्हायरसने दोन वर्षांपूर्वी जगभरात धुमाकूळ घातला होता. पुन्हा एकदा याच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण पाहायला मिळाले आहेत. दरम्यान कोरोना विषाणूविषयी नेहमीच नवनवीन माहिती मिळत असते. आता कोरोनाचे इन्फेक्शन आपला आवाजही हिरावून घेऊ शकते असा धक्कादायक खुलासा एका स्टडी रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. Covid 19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा पहिला रुग्ण समोर आला आहे.

काय धोका?
कोरोना संसर्गामुळे मज्जासंस्थेशी संबंधित अथवा न्यूरोपॅथिक समस्या देखील होऊ शकतात, असे अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स आय अँड इयर रुग्णालयातील संशोधकांना आढळून आले आहे. यामुळेच, व्होकल कॉर्ड अर्थात आवाज नलिकेत पॅरालिसिसचे प्रकरण आढळून आले आहे.

जर्नल पीडियाट्रिक्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालात कोरोनामुळे होणाऱ्या इतर गंभीर समस्यांसंदर्भातही अलर्ट करण्यात आले आहे. संबंधित रिपोर्टनुसार, सार्स-सीओव्ही-2 व्हायरस संसर्गाच्या काही दिवसांनंतर, एका 15 वर्षांच्या मुलीला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला रुग्णालयात दाखल केले असता, मज्जासंस्थेवरील कोरोनाच्या दुष्परिणामामुळे तिला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस झाल्याचे निदर्शनास आहे. या मुलीला आधीपासूनच अस्थमा आणि एंक्झायटीची समस्याही होती.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, एंडोस्कोपिक तपासणीत तिच्या व्हॉइस बॉक्समध्ये आढळून येणाऱ्या दोन्ही व्होकल कॉर्डमध्ये समस्या दिसून आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...