spot_img
महाराष्ट्रलाडकी बहिण योजनेवरून कोर्टाचे राज्य सरकारांना खडे बोल

लाडकी बहिण योजनेवरून कोर्टाचे राज्य सरकारांना खडे बोल

spot_img

दिल्ली | वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीपूव लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपये दिले गेले. मात्र, नंतरच्या काळत या योजनेत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ करून ती रक्कम 2100 रुपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या अटीत अनेक बदल करण्यात आले आहेत.

फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत देखील लाडक्या बहिणींच्या योजनांचा मोठा गाजावाजा केला जात आहे. यावरून सुप्रिम कोर्टाने सरकारच्या निवडणूक जाहीरनाम्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायाधीशांच्या आर्थिक सुविधांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल खडे बोल सुनावले आहेत. राज्य सरकारांकडे लाडकी बहीण यांसारख्या योजनांसाठी पैसे आहेत, पण न्यायाधीशांच्या पगार आणि पेन्शनसाठी त्यांच्याकडे निधी नाही, असे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे.

यावर दाखल देत न्यायमूत बी. आर गवई आणि ए.जी मसीह यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणूक जाहीरनाम्यांचा संदर्भ दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की निवडणुकीच्या आधी लाडकी बहिण यांसारख्या योजना जाहीर केल्या जात आहे. दिल्लीतील पक्षांनी 2100 रुपये आणि 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे देखील कोर्टाने नमूद केले आहे. 2015 साली ॲाल इंडिया जसेस असोसिएशनने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याच्यावर सुनावणी सुरू असून या याचिकेच्या माध्यमातून पेन्शन सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“साकळाई, कुकडीसह अन्य प्रकल्पाचा मंत्री विखे पाटील यांनी घेतला आढावा”

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जलसंपदा विभागाने बांधकामाधीन सिंचन प्रकल्पाची कामे गतीने करून प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र...

कोल्हापूर हादरलं! मामाने भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केला भलताच कुटाणा; भयानक कारण समोर…

कोल्हापूर / नगर सह्याद्री - प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं....

नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा; विजेत्यास चांदीची गदा, चारचाकी गाडी, आमदार जगताप म्हणाले…

29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान आयोजन | जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आ. संग्राम...

नगर-पुणे महामार्गावरअपघात; चालकासह आठ जण..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर- पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात एसटी बस ट्रेलरवर आदळून...