spot_img
मनोरंजन‘भाजपशिवाय देशाकडे दुसरा पर्याय नाही, भाजपला 350 जागा मिळतील’, नाना पाटेकरांच्या 'या'...

‘भाजपशिवाय देशाकडे दुसरा पर्याय नाही, भाजपला 350 जागा मिळतील’, नाना पाटेकरांच्या ‘या’ वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : सुपरस्टार नाना पाटेकर यांचे असंख्य चाहते आहेत. अनेक सिनेमांमधील दमदार भूमिका साकारणारे नाना पाटेकर हे आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. ते केवळ सिनेमाचं नव्हे तर त्यांच्या वक्तव्याने देखील प्रसिद्ध आहेत.

आता सध्या नाना पाटेकर यांनी भाजप पक्ष आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं असून सध्या त्याचीच चर्चा सुरु आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांना ‘आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नाना पाटेकर म्हणाले, ‘देशाकडे भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही…’ सध्या नाना पाटेकर यांचं वक्तव्य सर्वत्र चर्चेत आहे.

‘आगामी निवडणुकीत भाजपला 350-375 जागा मिळतील आणि पुन्हा भाजप सत्तेत येईल. भाजप देशात उत्तम काम करत आहे. त्यामुळे 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजप पक्षाला नक्कीच यश मिळेल आणि पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील.. देशाकडे भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही.’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी नाना पाटेकर यांनी केलेलं भाकीत चर्चेत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...