spot_img
राजकारणमिझोरामची आज मतमोजणी ! धक्कादायक निकाल..सत्ता परिवर्तन, पहा..

मिझोरामची आज मतमोजणी ! धक्कादायक निकाल..सत्ता परिवर्तन, पहा..

spot_img

नगर सह्याद्री टीम : नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक पार पडल्या होत्या. यातील चार राज्यांची मतमोजणी काल झाली आहे. रविवारी झालेल्या मतमोजणीत राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली.

तेलंगणात सत्ता परिवर्तन होत बीआरएसचे सरकार गेले.तेलंगणात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. आता मिझोराममध्ये कोणाचे सरकार येणार? हे आज स्पष्ट होणार आहे. येथील मतमोजणी आता सुरु आहे. दरम्यान आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार 39 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.

यात झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ने 27 जागा जिंकल्या आहेत. इतर दोन जागा वेगवेगळ्या पक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत. मिझो नॅशनल फ्रंट (MNF) ने 10 जागा जिंकल्या आहेत. तर येथे भाजपच्या वाट्याला 2 जागा आल्या आहेत.

मिझोरामचे उपमुख्यमंत्री तवान्लुइया तुईचांगमध्ये झेडपीएमचे उमेदवार डब्ल्यू चुआनावामा यांच्याकडून पराभूत झाले आहेत. मिझो नॅशनल फ्रंट (MNF) च्या तवानलुइया यांना 6,079 मते मिळाली, तर झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) चे उमेदवार डब्ल्यू चुआनावामा यांना 6,988 मते मिळाली. एकंदरीतच येथेही सत्ता परिवर्तन होईल. MNF ची सात जाऊन या ठिकाणी ZPM ची सत्ता येईल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शहरात ‘मुळशी पॅटर्न’; वाढदिवसाच्या दिवशी नेत्याचा निर्घृण खून

Maharashtra Crime News :सांगली शहरात एका थरारक आणि धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. सांगलीत...

शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणीला, वाचा अपडेट

मुंबई । नगर सहयाद्री शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील मालकी हक्काच्या वादावर आज (बुधवार)पासून...

शेतमजुराचा मुलगा क्लासवन अधिकारी!; दीपक विधातेची ‘एसीएफ’ पदावर निवड

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- कर्जत तालुक्यातील छोट्या चापडगाव या गावातून उगवलेली प्रेरणादायी कहाणी सध्या...

मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटात धनंजय मुंडेंच्या समर्थकाला अटक, तिसऱ्याला रात्री उशिरा उचलला

जालना । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट...