spot_img
अहमदनगरनगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

spot_img

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी – सचिव आनंद वायकर
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी कामकाजात हस्तक्षेप करीत दमदाटी केली. कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असल्यामुळे मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने काम बंद आंदोलन न करता निषेध सभेचे आयोजन केले होते. दरम्यान कर्मचारी युनियनच्यावतीने संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजुरकर यांना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी दमदाटी केल्याच्या निषेधार्थ मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, शहर अभियंता मनोज पारखे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, अस्थपणा विभाग प्रमुख मेहेर लहारे, कार्याध्यक्ष नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, विठ्ठल उमाप, महादेव कोतकर, बाबासाहेब राशीनकर, उपाध्यक्ष अमोल लहारे, भास्कर अकुबत्तीन, प्रफुल्ल लोंढे, अजित तारु, राजेंद्र बोरुडे, सोनू चौधरी, किशोर कानडे, राहुल तनपुरे आदी उपस्थित होते.

सचिव आनंद वायकर म्हणाले की, महापालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी काम करत असताना त्यांना दमदाटी, धक्काबुक्की, शिवीगाळ करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले आहे.
यावर आळा बसणे गरजेचे आहे डॉ. राजुरकर यांच्या संदर्भात घडलेल्या प्रकारामध्ये पोलिसांनी व मनपा प्रशासनाने आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मदत केली, व संबंधितावर गुन्हा देखील दाखल केला आहे अशा घटना घडू नये यासाठी मनपा प्रशासनाने कामकाजामध्ये नियमावली करून द्यावी व कर्मचाऱ्यांनी देखील आपल्याला दिलेल्या कामाची जबाबदारी ओळखून काम करावे. विनाकारण अधिकारी कर्मचारी यांना त्रास देणे योग्य नाही युनियन कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी असल्याचे सांगितले.

आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर म्हणाले की, अन्यायाच्या विरोधात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. माझ्या बाबत घडलेल्या घटने संदर्भात प्रशासन ठामपणे उभे राहिले आहे. शासकीय नोकरी करीत असताना आपण समाजासाठी काम करत असतो नियमबाह्य काम करणार नाही. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्रास देऊन व शिव्या देऊन काम होत नसते. उलट अधिकारी मनस्ताप करत असतात नोकरी करण्याची इच्छा राहत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे व अन्य 1 नागरिक हे प्र. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे दालनात कामकाज चालू असताना कार्यालयात येवून अर्वाच्य भाषेत आरडा ओरड करून धमकी देवून प्र. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना शिवीगाळ केलेली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेवून संबाधितावर कठोर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सिस्पे विरोधात ठेवीदार आक्रमक; पाच दिवसात पैसे जमा न झाल्यास…, काय दिलाय इशारा पहा

  पारनेर / नगर सह्याद्री- पारनेर, सुपा परिसरातील सुमारे चारशे कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या 'सिस्पे कंपनी'...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...

बदनाम करण्यासाठी ‘त्यांची’ दुकानदारी, भ्रष्टाचार काळात शिवसेनेची सत्ता; आ. जगताप यांनी विरोधकांचा घेतला समाचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे स्वयंघोषित नेते खा. संजय राऊत यांना...