spot_img
अहमदनगरसहकार हा समाजाच्या आर्थिक उन्नतीचा पाया: आमदार दाते

सहकार हा समाजाच्या आर्थिक उन्नतीचा पाया: आमदार दाते

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
सहकार ही सामूहिक प्रयत्नांतून सर्वांगीण प्रगती साधणारी संकल्पना आहे. ग्रामीण भागातील आर्थिक विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा असून, यामुळे शेतकरी, लहान उत्पादक आणि उद्योजकांना समान संधी मिळतात. सहकारात राजकारण नको, ही भूमिका तालुक्यातील सर्वांनी ठेवली, असे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी केले. पारनेर शहरातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात जी.एस. महानगर बँकेच्या सभासद आणि कार्यकर्त्यांची आभार सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब भालेकर होते. याप्रसंगी बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके, उपाध्यक्ष भास्कर कवाद, सि.बा. अडसूळ, भास्कर खोसे, प्रभाकर कवाद, अशोक सावंत, सभापती किसन रासकर, माजी सभापती गणेश शेळके, सुरेश बोरुडे, गंगाराम बेलकर, डॉ. आबासाहेब खोडदे, शिक्षक नेते सुनील फापाळे, बाळासाहेब लामखडे, ठकाराम लंके, वसंत कवाद, निलेश खोडदे, सरपंच संतोष काटे आणि बँकेचे सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.आमदार दाते म्हणाले, वसुली हा बँकेचा आत्मा आहे. सर्व संचालकांनी एकसंघ राहून बँकेला नव्या उंचीवर न्यावे. यावेळी पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने उपाध्यक्ष सुरेश बोरुडे यांनी गीतांजली शेळके यांचा पुणेरी पगडी देऊन सत्कार केला.

कठीण काळात सर्वांची साथ : गीतांजली शेळके
बँक निवडणुकीत खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मोलाची साथ दिली. स्व. सॉली गुलाबराव शेळके यांची संस्काराची शिदोरी आणि स्व. उदय शेळके यांची बँक चालवण्याची सचोटी यांचा आधार घेऊन पारदर्शक कारभार करणार आहे, असे जी.एस. महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! तीन आरोपी जाळ्यात..

अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- पाथर्डी तालुक्यात आणि नगर परिसरात भीती निर्माण करणाऱ्या घरफोडी व...

वीजपुरवठा खंडित; नागरिक वैतागले; आमदार जगताप यांना दिले निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री कल्याण रोड परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असून,...

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई!, ‘या’ प्रकरणातील दोन मुख्य आरोपी जेरबंद

अहिल्यानगर | नगर सह्याद्री तपोवन रोडवरील गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे...

70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू!, बंधाऱ्यावर नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- बंधाऱ्यावरून पाय घसरून पडल्याने एका 70 वर्षीय वृद्धाचा गाळात अडकल्याने...