spot_img
अहमदनगरनवीन कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त विधान! महसूल दिनाच्या कार्यक्रमात काय घडलं?

नवीन कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त विधान! महसूल दिनाच्या कार्यक्रमात काय घडलं?

spot_img

Agriculture Minister Controversy: माणिकराव कोकाटे यांची कमतरता नवीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवघ्या २४ तासात भरून काढली आहे. राज्याचे नव्याने नियुक्त झालेले कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे त्यांच्या पहिल्याच सार्वजनिक भाषणात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महसूल दिनाच्या निमित्ताने इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात.” असे विधान केल्यामुळे उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महसूल विभागाकडून पारदर्शक व प्रामाणिक कारभार अपेक्षित असताना, मंत्र्यांचे हे विधान अनेकांना खटकले आहे.

कृषिमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून अवघे २४ तास होत नाही, तोच भरणे यांच्या या विधानामुळे विरोधकांना टीका साधण्याची संधी मिळाली आहे. महसूल दिनासारख्या कार्यक्रमात अशा प्रकारचे विधान करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. कार्यक्रमात पुढे बोलताना भरणे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर वेळेवर निर्णय घेण्याचे आणि शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मालेगाव बॉम्बस्फोटात पंतप्रधानांसह योगींना अडकवण्याचा कट होता; प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा दावा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा...

सिस्पेबाबत पोलिसांची कोणती मर्दुमकी?; त्याचवेळी दखल घेत असती तर सिस्पेची टोळी…

450 कोटींना टोपी घालणाऱ्या सिस्पे, ट्रेडज्‌‍च्या संचालकांवर न्यायालयाचे आदेशाने गुन्हा / आरोपी शोधण्याचे धाडस...

अयोध्येतील राम मंदिर उडविण्याची धमकी; बीडच्या तरुणाला मेसेज, लोकेशनही पाठवले

बीड / नगर सह्याद्री : अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा मेसेज बीडच्या एका तरुणाला...

‘आमदार जगताप यांच्या घरी संभाजी भिडे गुरुजींची भेट’; काय दिला सल्ला?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी...