कोतवाली पोलीस ठाण्यात २ तास ठिय्या
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरात सोमवारी सकाळी माळीवाडा भागात झालेल्या रांगोळी प्रकरणामुळे शहरात वातावरण तापले आहे. अशात मुस्लिम समाजाकडून कोतवाली पोलीस स्टेशन समोरच लावण्यात आलेल्या वादग्रस्त फलक व हिंदू तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आ. संग्राम जगताप आक्रमक होत त्यांनी संबधितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी कोतवाली पोलीस ठाण्यात २ तास ठिय्या दिला. कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संभाजी गायकवाड यांनी आ. संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे कायकर्ते कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये उपस्थित होते.
आ.संग्राम जगताप म्हणाले, हिंदूंचा पवित्र नवरात्र उत्सव सुरु आहे. मात्र शहरात काहींनी जातीय तेढ निर्माण करणारे फलक लावून मुद्दाम जातीय तेढ निर्माण करत आहेत. हे फलक त्वरित काढण्यात यावेत. नवरात्री निमित्त काढण्यात आलेल्या हिंदूंच्या दुर्गामाता दौड सुरु असताना काहिंनी हिंदूंच्या भावना दुखेल असे कृत्य केले आहे.
कोतवाली पोलीस स्टेशन जवळच हिंदू युवकाला नि:ष्कारण मारहाण केली. या सर्व घटना निंदनीय असून हिंदूंच्या भावना दुखावार्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी संबधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. शहरातील सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठवता शांतात ठेवावी, असे आवाहन केले.