अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
आंबेडकरी समाजाच्या वतीने संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उपदेशकेचे सामूहिक पठन करण्यात आले. यानंतर संविधान रक्षक आमदार संग्राम जगताप यांना संविधान उपदेशकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुरेश बनसोडे, प्रा. माणिक विधाते, परिमल निकम, अजय साळवे, संजय खामकर, रवींद्र कांबळे, रेशमा आठरे, लतीका पवार, विशाल कांबळे, संतोष पाडळे, विशाल भिंगारदिवे, कौशल गायकवाड, प्रकाश वाघमारे, सतीश शिरसाट, सुरेश वैरागर, समीर भिंगारदिवे, किरणगायकवाड, सुभाष वाघमारे, सुहास पाटोळे, विनोद कांबळे, संतोष नवसुपे, येसुदास वाघमारे, वैभव औटी, सौरभ कांबळे, दीपक सरोदे, सुजन भिंगारदिवे, गणेश कांबळे, शिवाजी भोसले, विजय कांबळे, गणेश केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या भारतीय संविधानामुळे जगाला प्रगल्भ लोकशाहीची प्रचिती आली. राजेशाहीचा अंत करून देशाची सूत्रे सर्वसामान्य मतदारांच्या हातात दिली. संविधान हे एका समाजापुरते नसून सर्व भारतीयांचे आहे. यामुळे देशात समता, बंधुता व स्वातंत्र्याचा भक्कम पाया निर्माण झाला. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली.
सुरेश बनसोडे म्हणाले की, संविधान दिन हा आपल्या सामाजिक बांधिलकीचा आणि अधिकार-जाणिवेचा प्रतीक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी संविधानाने मजबूत चौकट दिली आहे. आपण सर्वांनी संविधानातील मूल्यांचे जतन, पालन आणि प्रसार करण्याचे काय केले पाहिजे.



