राहता । नगर सहयाद्री:-
भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल १२ तास ठिय्या मांडला होता. वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तर आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयश्री थोरात यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहत्यामध्ये मेळावा घेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे.
विखे पाटील म्हणाले, दहशतवादाचे बीज तुम्ही रोवलंय. संगमनेरच्या घटनेबाबत आम्ही माफी मागीतली, तुमची ती सुद्धा दानत नाही. तुमचा भाऊ आणि तुमचा स्विय सहायक लाठ्या काठ्या घेऊन होते, मग दहशत वाद कुणाचा? असा सवाल देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित करत थोरातांवर हल्लाबोल केला आहे.
तसेच जनता त्यांच्या पाठीशी नाहिये, वैफल्यातून त्यांच्याकडून हे सगळे प्रकार सुरू आहे. त्या दिवशी सुजयला मारण्याचा कट होता मी त्याचा जाहीर निषेध करतो, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. तुम्ही भावी मुख्यमंत्री म्हणतात, अगोदर आमदार तर व्हा, असा टोला देखील त्यांनी थोरातांना लगावला.
भावी मुख्यमंत्री सोडा, अगोदर आमदार तर व्हा’;
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल, असे वक्तव्य केले होते. यानंतर बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे भावी मुख्य मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. आता यावरून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे यांनी बाळासाहेब थोरात यांना डिवचले आहे. जनता त्यांच्या पाठीशी नाहिये, वैफल्यातून त्यांच्याकडून हे सगळे प्रकार सुरू आहे. त्या दिवशी सुजयला मारण्याचा कट होता मी त्याचा जाहीर निषेध करतो, असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. तुम्ही स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणतात, अगोदर आमदार तर व्हा, असा टोला देखील त्यांनी बाळासाहेब थोरातांना लगावला.