spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट; कोणी दिली सुपारी; बड्या नेत्याचे नाव

मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा कट; कोणी दिली सुपारी; बड्या नेत्याचे नाव

spot_img

बीड / नगर सह्याद्री
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा एक मोठा आणि धक्कादायक कट उघडकीस आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, जरांगेंच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. याप्रकरणी जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करत बीड जिल्ह्यातून दादा गरुड आणि अमोल खुणे (जरांगेंचा पूर्वीचा सहकारी) या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात, बीड शहरात जरांगेंच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठका झाल्याचे समोर आले आहे. याच बैठकांत अडीच कोटींची डील ठरल्याची चर्चा आहे. ही माहिती मिळताच मध्यरात्री छापा टाकून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती मिळत आहे, मात्र पोलिसांनी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

या घटनेचे गांभीर्य ओळखून जरांगे यांनी स्वतः रात्री उशिरा जालना पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली. “आरक्षण आंदोलनाला कमजोर करण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत, पण आम्ही मागे हटणार नाही,” असे जरांगे म्हणाले.

या कटाचा पर्दाफाश झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. या कटामागे कोणत्या राजकीय शक्तींचा हात आहे, याचा तपास पोलिस करत असून, लवकरच आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकाराने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...