spot_img
अहमदनगरपतीच्या अपहरणाचा कट; पोलिसांनी केला भांडाफोड, फिर्यादीच निघाला आरोपी..

पतीच्या अपहरणाचा कट; पोलिसांनी केला भांडाफोड, फिर्यादीच निघाला आरोपी..

spot_img

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री
​भलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुका परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी, ‘अपहृत’ पती, त्याची पत्नी, वडील, सासू आणि सासरे अशा एकूण पाच जणांविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुद्द पोलिसांनीच याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

​याबाबत अधिक माहिती अशी की, २५ ऑक्टोबर रोजी हातवळण (ता. अहिल्यानगर) येथून तुकाराम महादेव यादव याचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, तपासात पोलिसांना वेगळाच संशय आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम महादेव यादव (आरोपी क्र. १) याचे मुळात अपहरण झालेच नव्हते.

​त्यानेच हा संपूर्ण बनाव रचला आणि यामध्ये त्याची पत्नी सुमन तुकाराम यादव, वडील महादेव सावळेराम यादव (दोघे रा. हातवळण), सासरे रामदास उध्दव सोनसाळे व सासू सिंधुबाई रामदास सोनसळे (दोघे रा. शेंडी) यांनी त्याला साथ दिली. या सर्वांनी संगनमत करून तुकाराम याला लपून राहण्यास मदत केली.

​एवढ्यावरच न थांबता, आरोपी सुमन यादव हिने पोलीस ठाण्यात एक वाढीव तक्रार (हकीगत) दिली. यामध्ये तिने, “गणेश कवडे, माऊली पठारे, सुनिल दिलीप पठारे व अक्षय भंडारे (सर्व रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा) यांनी आपल्या पतीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने उचलून नेले,” अशी खोटी माहिती दिली.

​या चौघांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी व त्यांचे मोठे नुकसान व्हावे, याच उद्देशाने हा संपूर्ण खोटा कट रचण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
​हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर, पोलीस उपनिरीक्षक भरत बाजीराव धुमाळ यांनी स्वतः याप्रकरणी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून, नगर तालुका पोलिसांनी आरोपी तुकाराम यादव, सुमन यादव, महादेव यादव, रामदास सोनसाळे आणि सिंधुबाई सोनसळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“‘मत चोरी’तून सत्तेत आलेल्या सरकारची ‘जमीन चोरी’ ; राहुल गांधींचा मोदी, फडणवीसांवर निशाणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले...

खळबळजनक! हत्येच्या कटात मुंडेंचा हात; मुंडे म्हणाले त्यांची आणि माझी

बीड / नगर सह्याद्री : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा...

नगरमध्ये तरुणाच्या घरासमोर तिघांचा पहाटे राडा, मोटारसायकलींची तोडफोड, काय घडलं पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ​"तो जर आम्हांला दिसला तर आम्ही त्याला जिवे ठार...

“भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा”, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश; जबाबदारी कोणावर पहा…

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. भटक्या...