spot_img
अहमदनगरAhmednagar Politics News: 'स्वयंघोषित कार्यसम्राट' रचताय 'किरण काळे' यांच्या विरोधात षडयंत्र! पुन्हा...

Ahmednagar Politics News: ‘स्वयंघोषित कार्यसम्राट’ रचताय ‘किरण काळे’ यांच्या विरोधात षडयंत्र! पुन्हा काय घडलं? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावे घेत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणे प्रवीण शरद गीते यास चांगलेच महागात पडले आहे. काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत किरण काळे यांचा कोणताही संबंध नसताना गीते याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सह वरिष्ठ नेत्यांची नावे येत काळे यांचे नाव जोडण्याचा बनाव रचला आहे. शहरातील दहशत, गुंडगिरी विरुद्ध सातत्याने आवाज उठवणार्‍या काळे यांनाच गुंड म्हणून खोटी माहिती प्रसारित करीत बदनाम करण्याचे कटकारस्थान विरोधकांनी रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने गुंदेचा यांनी केला आहे. गीते बनाव प्रकरणाचा पोलिसांनी मास्टरमाईंड शोधून काढण्याची काँग्रेसने मागणी केली आहे.

दिनांक १९ जून २०१४ रोजी एमआयडीसी मध्ये असताना समाज माध्यमांवर प्रवीण शरद गीते या इसमाचा समाज माध्यमांवर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला. गीते याने बीनबुडाचे वक्तव्य करून माझी समाजात नाहक बदनामी केली आहे. यावरुन काळे यांनी पोलिसांत गीतेवर गुन्हा दखल करण्यात आला आहे.दरम्यान, मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे की, गीते याने सिव्हील हॉस्पिटलला माध्यमांशी बोलतांना एक व एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देताना दुसरी हकीगत सांगितली आहे. यातून हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यापूर्वी तथाकथित आयटी पार्कचा इन कॅमेरा भांडाफोड केल्यानंतर किरण काळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सदर खोटी फिर्याद देणार्‍या महिलेविरुद्ध मे. न्यायालयात अहवाल सादर केला आहे. तथाकथित चावला हाफ मर्डर केस मध्ये देखील काळे यांना विरोधकांनी गोवले होते. मात्र त्याही प्रकरणात बनाव असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी खोट्या फिर्यादी दाखल होणार नाही त्यासाठी आधीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...