कार्यकर्त्याच्या व्हाट्सऍप ला हिंदू मोर्च्याचे स्टेट्स
संगमनेर | नगर सहयाद्री:-
विधानसभेच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर संगमनेर मध्ये धर्माच्या नावावर मतदान झाल्याची चर्चा जोर धरतं आहे. मध्यंतरी दोन धर्मातील लोकांच्या वादाच्या ठीनग्या पडल्याच्या घटना घडल्या होत्या त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी एका बाजूच्या लोकांची जास्त बाजू घेतल्याचे बोलले जाते.
सध्या बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या आत्याचाराच्या घटने विरोधात सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बांगलादेशातील हिंदूच्या बाजूने ठीक ठिकाणी मोर्चे काढले जातं आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून उद्या संगमनेर मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्च्याचे आयोजन केले आहे.
याआधी देखील अशाच प्रकारे हिंदुवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात मोर्चा निघाला होता तेव्हा माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी या मोर्चाच्या विरोधात भूमिका घेतली होती. गावातील धार्मिक वातावरण खराब करत असल्याचे आरोप देखील केले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत थोरात यांनी केलेल्या विरोधाचा मुद्दा उचलत विरोधी पक्षांनी उचलला होता.
आज पुन्हा एकदा होणाऱ्या या मोर्च्याला सर्व हिंदूंनी सहभागी होण्याच्या आवाहानाचे स्टेट्स थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ठेवल्याने गावात चर्चेचा विषय झाला आहे. अचानक भूमिका बदलत कार्यकर्ते हिंदुत्ववादी झाल्याचे पहायला मिळत आहे. विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी देखील मुख्यमंत्री यांना पत्र लिहून बांगलादेश मधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे.
अचानक पणे थोरात यांचे भाचे आणि कार्यकर्ते हिंदुत्ववादी भूमिका घेत असल्यामुळे गावात विविध चर्चा रंगत आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात दुरावलेला हिंदू या निमित्ताने पुन्हा एकदा जोडण्याचे काम तर होत नाही ना याची कुजबुज नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.