spot_img
अहमदनगरनगर जिल्ह्यातील 'या' जागांवर काँग्रेसने ठोकला दावा; आ. थोरात स्पष्टच म्हणाले, महायुती...

नगर जिल्ह्यातील ‘या’ जागांवर काँग्रेसने ठोकला दावा; आ. थोरात स्पष्टच म्हणाले, महायुती सरकारच्या…

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत नगर जिल्ह्यातील उत्तरेतील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोला या मतदारसंघांवर काँग्रेस उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेश समितीकडून पक्षाच्या नेत्यांना तातडीने तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के. सी. वेणूगोपाल, राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, विधानसभेचे पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वर्षाताई गायकवाड, अविनाश पांडे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आणि महानगर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्ह्याच्या आढाव्यासह नगर शहराच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. नगर लोकसभा निवडणुकीतील अनुभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती देण्यात आली. संगमनेर, श्रीरामपूर, राहाता, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव आणि अकोला या सात मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारच्या भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि युवकांच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी एकजुटीने निवडणूक लढवली तर महाविकास आघाडी 180 जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. 20 ऑगस्टला राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी मुंबईत काँग्रेसचा प्रचाराला प्रारंभ होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...