spot_img
अहमदनगरअहमदनगरमधील सात विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा; कोणत्या मतदारसंघांचा समावेश पहा

अहमदनगरमधील सात विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने ठोकला दावा; कोणत्या मतदारसंघांचा समावेश पहा

spot_img

सुनील चोभे / नगर सह्याद्री –
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासून पडघम वाजू लागले आहेत. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी चालविली असतांनाच जिल्हा काँग्रेसने अहमदनगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघांपैकी सात मतदारसंघावर दावा ठोकला आहे. या सात मतदारसंघामध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात सर्वांधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसवासियांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. लोकसभेच्या विजयामुळे अनेकांचा काँग्रेसमध्ये येण्याचा ओढा वाढला आहे. असे असतांनाच आगामी काळात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मतदारसंघांची चाचपणी सुरु केली आहे. वरिष्ठ स्तराव विधानसभा मतदारसंघातील जागा वाटपाबाबत जोर बैठका होत आहेत. विधानसभा निवडणुकीला अजून तीन महिन्यांचा अवघी असल्याने इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. प्रतिस्पर्ध्याला डोळ्यासमोर ठेवून आरोप प्रत्यारोपांचे बाण सोडले जात आहेत.

दरम्यान नगर शहर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा सांगितला आहे. तसेच काँग्रेसने नगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघापैकी सात मतदारसंघावर दावा ठोकला आहे. याबाबतचे पत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी ज्येष्ठ नेेते बाळासाहेब थोरात यांना पाठविले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. यामध्ये आपला व कॉग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे

जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. शिर्डी शिवसेना तर अहमदनगर राष्ट्रवादीकडे तर विधानसभेच्या एकुण १२ जागा आहेत. पैकी आपल्या काँग्रेस पक्षाकडे संगमनेर, श्रीरामपूर व शिर्डी अशा केवळ तीनच जागा आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला आणखी ४ जागा मिळणे गरजेचे आहे. त्यात श्रीगोंदा, नगर शहर, कोपरगांव व अकोला या जागा प्रधान्यक्रमाने घेणे गरजेचे असून जिल्ह्यातील या सातही मतदारसंघात आपल्या पक्षाची चांगली ताकद असून या मतदारसंघातून आपल्या नेतृत्वातून व पक्ष संघटनामुळे पक्षाचे उमेदवार नक्कीच विजयी होतील असा ठाम विश्वास आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील १२ पैकी ७ विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावेत असे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष वाघ यांच्या मागणीवर वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...