spot_img
अहमदनगरशहराच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; काँग्रेस बैठकीत कार्यकर्त्यांचा बंडाचा सूर

शहराच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; काँग्रेस बैठकीत कार्यकर्त्यांचा बंडाचा सूर

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना खासदार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. त्या विजयाचे खरे किंगमेकर हे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत. हे राष्ट्रवादीने विसरू नये. मागील पाच वर्षांपासून शहरामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावरती काँग्रेसनेच लढाई उभी केली आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला श्रीगोंद्याची जागा दिली. आघाडीचा धर्म राष्ट्रवादीने पाळावा. शहराची जागा काँग्रेसला सोडावी. अन्यथा किरण काळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी करावी, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी धरला आहे. जागा काँग्रेसला न सोडल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा काँग्रेसने राष्ट्रवादीला दिला आहे.

नगर शहराच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शहराची जागा काँग्रेसलाच मिळावी याकरिता काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीवर चांगलेच शरसंधान साधले. लोकसभेला आम्ही तुमचे काम केले. दक्षिणेत सहा जागा राष्ट्रवादी लढते. श्रीगोंदा ची एक जागा राष्ट्रवादीने शिवसेनेला दिली. मात्र काँग्रेसवर अन्याय का ? किरण काळे यांनी शहराच्या विद्यमान नेतृत्वाच्या विरोधात लढाई उभी केली. काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व आहे. पक्ष संघटना देखील अत्यंत मजबूत आहे. बूथ लेवल पर्यंत निवडणुकीची तयारी पक्षाने केली आहे. तरी देखील राष्ट्रवादी ही जागा सोडत नाही. आघाडी धर्म काँग्रेसने एकट्यानेच का पाळायचा ? असा सवाल बैठकीत कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

खा. लंके यांनी काँग्रेस मदतीची परतफेड करावी :
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक हाती घेतली नसती तर निलेश लंके खासदार होऊ शकले नसते. हे स्वतः लंके यांनी जाहीररित्या अनेक वेळा सांगितले आहे. नुसतेच कौतुक करून कसे चालेल ?आता मदतीची परतफेड करण्याची वेळ आली आहे. खासदार लंके यांनी त्यांच्या वरिष्ठांना स्पष्टपणे सांगितले पाहिजे. प्रत्यक्ष कृतीतून मदतीची परतफेड केली पाहिजे. ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलण्या करिता आहेत काय ? खासदारांनी ही जागा त्यांच्या वरिष्ठांना काँग्रेसचा सोडायला सांगावी. अन्यथा काँग्रेसला कोणीही गृहीत धरू नये. आम्हाला सर्व मार्ग मोकळे राहतील.

कर्जत जामखेड कार्यकर्त्यांची देखील राष्ट्रवादीवर नाराज :
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आ. रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात देखील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नुकतीच बैठक घेत पवार यांच्यावरती शरसंधान साधले होते. जिल्ह्यात राष्ट्रवादी ही काँग्रेसला दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेस नामशेष करण्याचा राष्ट्रवादीचा अजेंडा आहे काय ? असा सवाल दक्षिणेतील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.

शहराच्या जागेवरून रणकंदन:
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारां विरोधात भारतीय जनता पार्टीने विरोधी सूर लावला आहे. यामुळे महायुतीत अलबेल नसताना महाविकास आघाडीत देखील आता काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधात उघडपणे टीका केली आहे. यामुळे शहराच्या जागेवरून राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असे रणकंदन उभे झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...