spot_img
ब्रेकिंगकाँग्रेस नेत्याच्या भावाची दिवसाढवळ्या हत्या, जामिनावर सुटलेल्या गुंडाचा थरार

काँग्रेस नेत्याच्या भावाची दिवसाढवळ्या हत्या, जामिनावर सुटलेल्या गुंडाचा थरार

spot_img

अकोला / नगर सह्याद्री :
शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचे सावट पसरले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे धाकटे बंधू आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता संजय कौसल (वय 60) यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. या थरारक घटनेमुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना रणपिसे नगरातील मुरलीधर टॉवर परिसरात घडली आहे. महेंद्र पवार असे आरोपीचे नाव आहे. पवार हा सराईत गुन्हेगार असून एका पूर्वीच्या गंभीर प्रकरणात अटकेत होता. सध्या तो जामिनावर बाहेर होता आणि त्याच अवस्थेत त्याने ही हत्या केली.

धारदार हत्यारे वापरून हत्या
महेंद्र पवारने संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने सपासप वार करत त्यांना जागीच ठार मारले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

जुन्या वादातून हत्या
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संजय कौसल आणि महेंद्र पवार यांच्यात जुन्या वादाचे वावडे होते. दोघेही त्याच इमारतीत ‘मुरलीधर टॉवर’मध्ये राहत होते. जुन्या वैमनस्यातूनच ही क्रूर हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांची जलद कारवाई
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि काही तासांतच महेंद्र पवारला अटक केली. अकोल्याचे नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक आर्चित चांडक यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांच्या कार्यकाळातील पहिल्याच आठवड्यात ही मोठी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

राजकीय आणि सामाजिक स्तरावर संताप
संजय कौसल हे केवळ काँग्रेस नेत्याचे बंधूच नव्हते, तर अकोल्यातील एक आदरणीय, प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या हत्येमुळे स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली असून गुन्हेगारीवर लगाम घालण्याची मागणी जोर धरत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बॉम्बस्फोट नक्की कोणी घडवला?; सरकारला उत्तर द्यावेच लागणार…

विशेष संपादकीय । शिवाजी शिर्के:- मुंबईतील साखळी बाँब स्फोटातील सर्व आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर राज्य आणि...

नगर तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी ‘महेंद्र हिंगे’

उपाध्यक्षपदी दीपक दरेकर, भगवान मते, नाना डोंगरे तर सचिवपदी हंबर्डे अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुका...

तारकपूरला चोरट्यांचा डल्ला; दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- तारकपूर परिसरात चोरट्यांनी घरात डल्ला मारुन तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल लांबविला...

पारनेर तालुक्यातील ‌’या‌’ ५४ गावांचा डोंगरी विभागात समावेश!

सुपा । नगर सहयाद्री:- राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुधारित यादीनुसार पारनेर तालुक्यातील 54 गावांचा...