spot_img
महाराष्ट्रकाँग्रेसचा लढवय्या शिलेदार हरपला' ; खासदार वसंत चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन

काँग्रेसचा लढवय्या शिलेदार हरपला’ ; खासदार वसंत चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन

spot_img

Congress MP Vasant Chavan: नांदेडचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांनी हैदराबादमधील किम्स रुग्णालयात आज पहाटे चार वाजता अखेरचा श्वास घेतला. वसंत चव्हाण यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने खराब होत असल्यामुळे त्यांना नांदेड येथील रुग्णालयातून हैदराबाद येथे हलवण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसने एक निष्ठावान नेता गमावला आहे.

वसंत चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सरपंच म्हणून सुरूवात केली. १९७८ मध्ये त्यांनी नायगाव या गावात सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद आणि राज्य विधान परिषदेवर कार्यरत राहून राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून येत त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारला होता.

सर्वात उल्लेखनीय म्हणजे, वसंत चव्हाण २०२४ मध्ये सत्तरीच्या वयात लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन काँग्रेसचे प्रतिनिधी ठरले. त्यांच्या निधनामुळे नांदेड आणि काँग्रेसमध्ये एक मोठा रिक्तपणा निर्माण झाला आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना, समर्थकांना आणि काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कामगिरीला सर्व स्तरांवरून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

लढवय्या नेता हरपला : बाळासाहेब थोरात
“काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. काँग्रेस पक्षाने एक लढवय्या नेता आणि आपण एक सहकारी गमावला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी नांदेड जिल्ह्यात काँग्रेस विचार टिकवून ठेवला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही सर्वजण चव्हाण कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...