spot_img
अहमदनगरविधानसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली; आ. थोरात करणार मार्गदर्शन

विधानसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली; आ. थोरात करणार मार्गदर्शन

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने देखील नगर शहरात कार्यकर्त्यांचा महासंकल्प मेळावा आयोजित केला आहे. गुरूवार दि.२५ रोजी सावेडीतील माऊली सभागृह येथे दुपारी ४.३० वाजाता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात हे उपस्थिांना मार्गदर्शन करणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व प्रदेश काँग्रेसने मुंबईत नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकी संदर्भात सविस्तर आढावा घेतला. यावेळी काँग्रेसने लढत असलेल्या यापूर्वीच्या संगमनेर, श्रीरामपूर, राहता या, तसेच दक्षिणेतील नगर शहरासह एकूण सात जागांवर दावा केला आहे.

आता विधानसभेसाठी सात जागा काँग्रेसला मिळाव्यात अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे. नगर शहरासह श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले या मतदारसंघांवर देखील आम्ही दावा केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महाविकास आघाडी अधिक बळकट करत असताना काँग्रेस पक्षाचा राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. नगर जिल्ह्यातून देखील काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे वाघ यांनी सांगितले.

किरण काळे म्हणाले की, आजमीतीस थोरात हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. आगामी विधानसभा तसेच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुकांसाठी काँग्रेस बळकट करण्याची मोहीम पक्षाने हाती घेतली आहे. मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. यावेळी आ. लहू कानडे यांच्यासह नगर शहर व ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, पक्षाच्या विविध आघाड्या, फ्रंटल, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

काँग्रेस फुंकणार विधानसभा निवडणूकींचे रणशिंग
जून महिन्यात राष्ट्रवादी एसपी पक्षाचा वर्धापन दिनाचा राज्यस्तरीय मेळावा नगर शहरात झाला. त्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते खा. संजय राऊत यांनी जिल्ह्यात श्रीगोंदा मतदारसंघाचा दौरा केला. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार दक्षिणेचा दौरा केला. यानंतर आता आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग महासंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून नगर शहरातून फुंकणार आहे. यावेळी थोरात कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरसेवकांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला! दोन दिग्गज नेते प्रवेश करणार

20-25 आजी-माजी नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश | पदाधिकाऱ्यांचाही समावेश दोन दिग्गज नेते अन आजी-माजी...

शरद पवार-अजित पवार एकत्र!; बंद दाराआड चर्चा, चर्चांना उधाण…

पुणे / नगर सह्याद्री - शरद पवार आणि अजित दादा हा पवार कुटुंबियांसाठीच नाही...

ट्रॉफिकच्या हप्तेखोर बोरसेंना दोन दिवसात हाकला!; नगर शहरवासीयांच्या भावनांची आ. संग्राम जगताप यांच्याकडून दखल

‌‘नगर सह्याद्री‌’चा इम्पॅक्ट | आ. जगताप यांनी एसपींना दिला अल्टीमेटम। खातेनिहाय चौकशी करण्याची गृहमंत्र्यांकडे...

मंत्री विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान; म्हणाले हा सन्मान…

लोणी / नगर सह्याद्री आधुनिक कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन झालेल्या...