spot_img
अहमदनगरकाँग्रेसची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; अहिल्यानगरमध्ये कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा..

काँग्रेसची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; अहिल्यानगरमध्ये कुणाला मिळाली उमेदवारी? वाचा..

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली. दिल्लीमध्ये शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काही जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज काँग्रेसकडून 23 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसने 48 उमेदवारांची घोषणा केली होती.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत कोण कोणत्या नावांचा समावेश?
भुसावळ – राजेश मानवटकर, जळगाव (जामोद) – स्वाती वाकेकर, अकोट – महेश गंगाणे, वर्धा – शेखर शेंडे, सावनेर – अनुजा केदार, नागपूर दक्षिण – गिरीश पांडव, कामटी – सुरेश भोयार, भंडारा – पुजा तवेकर, अर्जुनी मोरगाव – दिलीप बनसोड, राळेगाव – वसंत पुरके, यवतमाळ – अनिल मांगुळकर, अण – जितेंद्र मोघे, उमरेखड – साहेबराव कामंबळे, जालना – कैलास गोरंट्याल, औरंगाबाद ईस्ट – मधुकर देशमुख, वसई – विजय पाटील, कांदिवली ईस्ट – कालू भडेलिया, चारकोप – यशवंत सिंह, सायन कोळीवाडा – गणेशकुमार यादव, श्रीरामपुर – हेमंत ओगले, निलंगा – अभयकुमार साळुंके, शिरोळ – गणपतराव पाटील.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत नागपूर जिल्ह्यातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर दक्षिण मधून गिरीश पांडव, सावनेर मधून अनुजा सुनील केदार आणि कामठी मधून सुरेश भोयर यांना उमेदवारी दिली. नागपूर दक्षिण च्या जागेवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आग्रही होती. अखेर मविआ मध्ये दक्षिण नागपूर काँग्रेससाठी सुटली आहे. तर सावनेर मधून ज्येष्ठ काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली. जिल्हा मध्यवत बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी रद्द झाली असून त्यांना पुढील निवडणूक लढता येत नसल्याने पत्नी अनुजा केदार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगाव हादरलं! महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन ते चार जणांनी घेरलं अन्..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील एका परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याचे वृत्त हाती आले आहे....

दोन झेडपी तर चार पंचायत समिती सदस्य वाढले; अनेक गावांचे गट बदलले, वाचा प्रारूप प्रभाग रचना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत...

ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर ; क्रिकेटचाही समावेश, वाचा, कधी कुठली स्पर्धा?

Olympic schedule : बहुप्रतीक्षित ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ...

पावसाने पुन्हा एकदा दणका दिला! ‘कमबॅक’ मुळे या’ भागात पुरजन्य स्थिती, अहिल्यानगरलाही इशारा..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची...