spot_img
अहमदनगरनाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी गोंधळ

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी गोंधळ

spot_img

मतपेटीत मतपत्रिका आढळल्या जास्त | शिवसेनेनेच्या ठाकरे गटांने घेतला आक्षेप
नाशिक | नगर सह्याद्री:-
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीत दोन वेळेस जास्त मतपत्रिका आढळून आल्या आहेत. एकूण पाच बोगस मतपत्रिका जास्त आढळल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आला. आता या प्रकरणाची शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. दरम्यान या मतमोजणीचा निकाल सोमवारी रात्री उशीरा पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणूकीत शिंदे गटाचे किशोर दराडे व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चूरस पाहयाला मिळत आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी काही वेळापूर्वी एका मतपेटीत तीन मतपत्रिका जास्त आढळल्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे यावर शिवसेनेने आक्षेप घेत मतमोजणीची प्रक्रिया काहीवेळ थांबविण्यात आली होती. तसेच चोपडा येथील २२ क्रमांकाच्या मतदान केंद्रात ९३५ मतदान झाल्याची नोंद होती. मात्र, याठिकाणी मतपेटीमध्ये ९३८ मतपत्रिका आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवरील मतपेटीमध्ये अधिक मतपत्रिका आढळून आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील येवला आणि निफाड या मतदान केंद्राच्या मत पेटीमध्ये एक-एक मतपत्रिका ज्यादा आढळून आली आहे. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

तसेच अजूनही मत पत्रिकांचे दुपारी उशीरा पर्यंत गठ्ठे बांधण्याचे काम सुरु होते. या मतपत्रिकांच्या सातत्याने होणार्‍या घोळामुळे उमेदवारांकडून या मतपत्रिकांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पाच मतपत्रिका बाजूला काढून ठेवण्यात आल्या असून या मतपत्रिकांचे नेमके काय करायचे? याबाबत अंतिम टप्प्यात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे. ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांना फोन करत नेमकी काय घटना घडली याबाबतची माहिती घेतली.

जर मतपत्रिका सील केलेल्या असतील तर पाच मतपत्रिका जास्त आल्या कशा? आणि कुठल्या जिल्ह्यातल्या याबाबतची माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने यावर नेमका काय आक्षेप घेतला आणि त्याचे पुढे काय होणार याची देखील त्यांनी माहिती घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे प्रत्येक मतदारसंघाकडे बारीक लक्ष असल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या प्रकाराबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतपत्रिका जास्त आल्याने संशय
चोपडा तालुयातील एका मतदान केंद्रावर मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. मतपत्रिका जास्त कशा आल्यात? याची माहिती अधिकार्‍यांनी द्यावी. मटपेट्या सील करताना अधिकार्‍यांच्या सह्या असतात. त्यामुळे मतपत्रिका जास्त आल्याने आम्हाला संशय आहे. ज्या अधिकार्‍याच्या अंतर्गत हे मतदान केंद्र येते, त्याच्यावर कारवाई करा. मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्यात का? याचा तपास करा.
– सुधाकर बडगुजर,
जिल्हाप्रमुख, नाशिक (ठाकरे गट)

अशी सुरू आहे मतमोजणी
विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड सुरु आहे. ३० टेबलवर ही मतमोजणी सुरू असून प्रत्येक टेबलवर सहा असे १८० कर्मचारी मतमोजणी करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...