spot_img
महाराष्ट्रमहायुतीमधील कलह चव्हाट्यावर; धस अजित पवार गटावर बरसले

महायुतीमधील कलह चव्हाट्यावर; धस अजित पवार गटावर बरसले

spot_img

बीड | नगर सह्याद्री

बीडच्या आष्टीत महायुतीत वादाची ठिणगी उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. ’पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत… दाल मे कुछ तो काला है’, असे म्हणत बीडच्या आष्टी मतदासंघाचे भाजप उमेदवार सुरेश धस यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुरेश धस यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी आता मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत, असे वक्तव्य सुरेश धस यांनी भर प्रचारसभेत केले आहे. त्यांच्या या टीकेमुळे जोरदार चर्चा होत आहे. सुरेश धस हे आष्टी मतदारसंघातील महायुतीमधल भाजपचे उमेदवार आहेत. आष्टी मतदारसंघामध्ये मंगळवारी त्यांची सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी अजित पवार गटावर टीका केली.

सुरेश धस यांनी सांगितले की, ’महायुतीचा उमेदवार म्हणून मला घोषीत केले आणि ऐनवेळी घड्याळाचा एबी फॉर्म येतो आणि ते सुद्धा ऐवढ्या जोरात सांगतात की एबी फॉर्म आला. जसं काय डोनाल्ड ट्रम्पच्या पक्षाचा फॉर्म आलाय. पहिलेच तुमच्या घड्याळाचे बारा वाजलेत. लोकांची भावना मोठ्या पवारांकडे आहे. छोट्या पवारांकडे नकारात्मक भावना आहे.’ तसंच,’मग आतून नेमकं चाललंय काय? दाल मे कुछ तो काला है… हे कोणी केलं? घड्याळ चिन्ह दिले गेले, कमळाला रोखण्यासाठी? आणि हे जे केले तर प्रचार सुरु केला. मी तर म्हटलं होतं बिगर चिन्हाची निवडणूक घ्या.’, असे म्हणत सुरेश धस यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केली. सुरेश धस यांच्या या निर्णयामुळे आणि वक्तव्यावरून बीडमध्ये महायुतीतील वाद चिघळण्याचे चिन्ह दिसत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर दहशतमुक्‍त करा; युवकांना रोजगार, गावांना पाणी देवू न शकणा-यांना धडा शिकवा, पालकमंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा

महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ सावरगावतळ आणि पेमगिरी येथे प्रचार सभा संगमनेर /...

सोलापूरकरांसाठी गुडन्यूज! ‘या’ तारखेपासून सुरू होणार विमानसेवा

सोलापूर / नगर सह्याद्री : सोलापूर विमानतळाहून पुढील दहा दिवसात 'उड्डाण' होण्याची शक्यता वर्तवली...

मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी सत्तारूढ महायुतीने कुठलाही फॉर्म्युला निश्‍चित केलेला नाही....

शरद पवार यांचे प्राजक्त तनपुरेंबाबत महत्वाचे विधान, नेमकं काय म्हणाले पहा…

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे जाहीर सभा राहुरी | नगर सह्याद्री फोडाफोडीमुळे लोकसभेत...